
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉक बुधवारी 2 टक्के वाढीसह 24.30 रुपये किमतीवर पोहचला होता. आज देखील हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. नुकताच येस बँकेने आपले जून 2024 तिमाही निकालांचे तात्पुरते आकडे जाहीर केले आहे. त्यामुळे येस बँक स्टॉक किंचित तेजीत आला आहे. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 76,000 कोटींपेक्षा जास्त आहे. ( येस बँक अंश )
येस बँकेने दिलेल्या माहितीनुसार जून 2024 तिमाहीत येस बँकेचे कर्जे आणि ऍडव्हान्स वार्षिक आधारावर 14.8 टक्क्यांनी वाढून 2,29,920 कोटी रुपयेवर पोहोचले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत येस बँकेचे कर्ज आणि ऍडव्हान्स प्रमाण 2,00,204 कोटी रुपये होते. आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.084 टक्के वाढीसह 23.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
येस बँकेने दिलेल्या माहितीनुसार, जून तिमाहीत बँकेच्या ठेवी 20.8 टक्क्यांच्या वाढीसह 2,64,910 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत येस बँकेच्या ठेवी 2,19,369 कोटी रुपये होते. ऑक्टोबर 2023 मध्ये येस बँक स्टॉक 14.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहोचला होता. या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 70 टक्क्यांनी वाढला आहे.
फेब्रुवारी 2024 मध्ये येस बँकेचे शेअर 32.81 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 28 टक्क्यांनी घसरला आहे. 2024 या वर्षात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 6 टक्के परतावा कमावून दिला आहे. ऑगस्ट 2018 मध्ये येस बँकेचे शेअर्स 390 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 94 टक्के खाली आला आहे.
आनंद राठी फर्मच्या तज्ञांच्या मते, जर येस स्टॉक 24.65 रुपये रेझिस्टन्स लेव्हलच्या पार गेला तर शेअर अल्पावधीत 26.65 रुपये किमतीवर जाऊ शकतो. येस बँकेची अल्पकालीन ट्रेडिंग रेंज 23 रुपये ते 27 रुपये दरम्यान असेल. या स्टॉकला 24.80 रुपये किमतीवर प्रतिकाराचा सामना करावा लागू शकतो. गुंतवणूकदारांनी हा स्टॉक 21.50 रुपये ते 23.50 रुपये या श्रेणीत खरेदी करावा. आणि 27-35 रुपये टार्गेटसाठी लॉन्ग पोझिशन होल्ड करावी.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.