
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. सध्या जर तुमच्याकडे येस बँकेचे शेअर्स असतील तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, सध्या येस बँक स्टॉकमध्ये मंदीचे संकेत पाहायला मिळत आहे. ( येस बँक अंश )
त्यामुळे तज्ञांनी गुंतवणुकदारांना येस बँक स्टॉकमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.42 टक्के वाढीसह 24.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील काही दिवसापासून येस बँक स्टॉकमध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. त्यामुळे तज्ञांनी या स्टॉकमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. सध्या जर तुम्ही या स्टॉकमधून बाहेर नाही पडलात तर तुम्हाला पुढील काळात लॉस बुक करावा लागू शकतो. तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉकमध्ये 20 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 20 रुपये किमतीच्या खाली गेला तर शेअर आणखी खाली येऊ शकतो.
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 1.44 टक्क्यांच्या घसरणीसह 23.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 32.85 रुपये होती. मागील एका वर्षात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 55.70 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.