
Yes Bank Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेच्या शेअर्समध्ये किंचित वाढ पाहायला मिळाली होती. मात्र दिवसा अखेर या बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री सुरू झाली. शुक्रवारी येस बँकेचे शेअर्स 0.50 टक्के वाढीसह 29.16 रूपये किमतीवर ओपन झाले होते.
इंट्रा-डे सेशनमध्ये हा स्टॉक 2.41 टक्क्यांच्या वाढीसह 29.71 रुपये किमतीवर पोहचला होता. त्यानंतर गुंतवणुकदारांनी शेअर विक्रीला सुरुवात केली. आणि शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँक स्टॉक 2.07 टक्के घसरणीसह 28.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
नुकताच ग्लोबल गुंतवणूक कंपनी ‘द कार्लाइल’ ग्रुपने येस बँकेचे 39 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकले आहेत. याचाच परिणाम शेअरच्या किमतीवर पाहायला मिळाला आहे. कार्लाइल समूहाने गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे 1.3 टक्के भाग भांडवल 1,057 कोटी रुपये किमतीवर विकले आहे.
कार्लाइल ग्रुपने येस बँकेचे 39 कोटी शेअर्स आपल्या सहयोगी सीए बास्क इन्व्हेस्टमेंट्स कंपनीद्वारे विकले आहेत. CA Basque Investments कंपनीने येस बँकतील 1.35 टक्के भाग भांडवल म्हणजे 39 कोटी शेअर्स 27.10 रुपये किमतीवर विकले आहे. या शेअर्सचे एकूण मुल्य 1,056.90 कोटी रुपये आहे.
या ब्लॉक डीलनंतर येस बँकेमध्ये कार्लाइल ग्रुपचा वाटा 6.43 टक्केवरून कमी होऊन 5.08 टक्केवर आला आहे. दरम्यान Morgan Stanley Asia Singapore कंपनीने येस बँकेचे 30.63 कोटी पेक्षा जास्त शेअर्स खरेदी केले होते, जे एकूण भाग भांडवलाच्या 1.06 टक्के आहे.
मागील 6 महिन्यांत येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 74 टक्क्यापेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवडयांची उच्चांक किंमत पातळी 32.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 14.10 रुपये होती. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 84,506.67 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.