
Yes Bank Share Price | लोकप्रिय बँकिंग शेअर येस बँकेच्या शेअर्समध्ये नुकतीच लक्षणीय वाढ झाली आहे. 9 फेब्रुवारीरोजी या शेअरने 32.81 रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. मात्र, यानंतर कंपनीच्या बँकेच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली.
शुक्रवारी हा शेअर 3.42 टक्क्यांनी घसरून 26.23 रुपयांवर बंद झाला. म्हणजेच 52 आठवड्यांचा उच्चांक गाठल्यानंतर अवघ्या 11 दिवसांत या शेअरमध्ये 20 टक्क्यांची घसरण झाली आहे. या घसरणीमुळे कंपनीचे मार्केट कॅप 75,453 कोटी रुपयांवर आले आहे. शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 14.10 रुपये आहे.
येस बँकेच्या शेअर्सची कामगिरी कशी आहे?
गेल्या महिन्याभरात येस बँकेच्या शेअर्सनी जवळपास 6 टक्के परतावा दिला आहे. तर गेल्या 6 महिन्यांत या शेअरमध्ये 55 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांनी 60 टक्के नफा कमावला आहे. मात्र 5 वर्षात हा शेअर 89 टक्क्यांनी घसरला आहे.
येस बँकेबाबत ब्रोकरेजचे मत काय आहे?
गोल्डमन सॅक्सने खासगी बँकेसाठी 16 रुपये उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार बँकेच्या शेअर्समध्ये सध्याच्या पातळीवरून 39 टक्क्यांची मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. गोल्डमन सॅक्सने या अहवालात इतर बँकांबाबतही मते मांडली आहेत.
खासगी बँकांबाबत बोलताना गोल्डमन सॅक्सने एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक लिमिटेड, इंडसइंड बँक, बंधन बँक आणि कोटक महिंद्रा बँकेवर ‘बाय’ कॉल कायम ठेवले आहेत. एचडीएफसी बँकेचे शेअर्स 33 टक्क्यांनी वधारतील, असा ब्रोकरेजचा अंदाज आहे.
ब्रोकरेजने बजाज फायनान्सशेअर ला अपग्रेड केले
ब्रोकरेज फर्मही बजाज फायनान्सवर उत्साही आहे आणि त्याने ती अपग्रेड केली आहे. ब्रोकरेज ने ते विक्रीतून न्यूट्रलमध्ये अपग्रेड केले आहे. हा शेअर 2 टक्क्यांनी वाढेल, असा त्यांचा अंदाज आहे. गोल्डमन सॅक्सच्या विश्लेषकांनी सांगितले की, वित्तीय क्षेत्राच्या कमाईला पुढे अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. ब्रोकरेज ने आर्थिक वर्ष 2025 आणि 2026 मध्ये आपल्या कव्हरेज विश्वातील कंपन्यांच्या कमाईच्या अंदाजात सरासरी 5% आणि 2% कपात केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.