
Yes Bank Share Price | येस बँकेने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या कालावधीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. येस बँकेने ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 तिमाहीत मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 349.70 टक्के वाढीसह 231.60 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत येस बँकेने 51.50 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
अनेक तज्ञांनी आणि गुंतवणूकदारांनी डिसेंबर 2023 च्या तिमाहीत येस बँक 415 कोटी रुपये निव्वळ नफा कमवू शकते, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र बँकेचा निव्वळ नफा अंदाजापेक्षा किंचित कमी आला आहे. आज सोमवार दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 1.01 टक्के घसरणीसह 24.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
येस बँकेच्या तिमाही निकालानुसार बँकेचा एनपीए फक्त 2 टक्के नोंदवला गेला आहे. मागील वर्षी देखील बँकेचे NPA प्रमाण 2 टक्के होते. मात्र या तिमाहीत येस बँकेचा, निव्वळ एनपीए 0.9 टक्के नोंदवला गेला आहे. डिसेंबर 2023 तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर येस बँकेचे शेअर्स गुरुवारी 24.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
प्रभुदल लिलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते,”मागील 3 महिन्यांत येस बँकेचे शेअर्स 16 रुपये सपोर्ट झोनमधून बाहेर पडले आहे. जर येस बँक स्टॉक 25.70 रुपये ते 26 रुपये झोनच्या बाहेर पडला, तर शेअर्सची किंमत 28.50 रुपये ते 31 रुपये किमतीच्या पार जाऊ शकते”. येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 26.25 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 14.40 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.