
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये मागील काही दिवसापासून जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. येस बँक स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या SMA किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. येस बँक स्टॉकचा RSI इंडेक्स 56.47 अंकावर आहे. ( येस बँक अंश )
हा स्टॉक ओव्हरसोल्ड किंवा ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत नाही. मंगळवारी येस बँकेचे शेअर्स 3.57 टक्क्यांच्या वाढीसह 25.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 3.38 टक्के वाढीसह 26.58 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मागील एका वर्षात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 52.45 टक्के परतावा कमावून दिला आहे. जून तिमाहीमध्ये येस बँकेने 502 कोटी रुपये नफा कमावला आहे. वार्षिक आधारावर येस बँकेच्या नफ्यात 46.7 टक्के वाढ झाली आहे. येस बँकेच्या ताळेबंदात 14.6 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली गेली असून क्रेडिट-डिपॉझिट गुणोत्तर मार्च तिमाहीतील 85.5 टक्क्यांच्या तुलनेत वाढून जून तिमाहीत 86.6 टक्केवर पोहचले आहेत. मागील दोन तिमाहीत येस बँकेने आर्थिक कामगिरीत लक्षणीय सुधारणा केली आहे.
वेल्थमिल सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉकने 24 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. जर हा स्टॉक सपोर्ट किमतीच्या वर टिकला तर शेअरची किंमत 27-28 रुपये किमतीवर जाऊ शकते. दीर्घ कालावधीत हा स्टॉक 31-32 रुपये किमतीवर जाऊ शकतो. एंजल वन फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँकेचे शेअर्स पुढील काही दिवसात 28 रुपये किमतीवर जाऊ शकतात. मात्र गुंतवणूकदारांनी पैसे लावताना 24 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. येस बँक स्टॉकचा प्राइस-टू-इक्विटी गुणोत्तर 1.85 वर असून P/B मूल्य 55.39 अंकावर आहे. या स्टॉकचा EPS 0.45 टक्केवर असून RoE 3.35 वर आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.