 
						Yes Bank Share Price | येस बँकचे शेअर्स मागील काही दिवसापासून जबरदस्त कामगिरी करत आहेत. मागील आठवड्यात.या कंपनीचे शेअर्स तीन टक्क्यांनी मजबूत झाले होते. ते आज हा स्टॉक जबरदस्त तेजीत वाढत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकचे शेअर्स 3.21 टक्के वाढीसह 17.34 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आणि इंट्रा-डे ट्रेडमध्ये हा स्टॉक 16.70 रुपये किमतीवरून 5.14 टक्क्यांच्या वाढीसह 17.58 रुपये किमतीवर पोहचला आहे.
सध्या येस बँकच्या शेअर्समधील ही तेजी सुभाष चंद्रा यांच्यावरील खटल्याचा निकाल आल्याने पाहायला मिळत आहे. या निकालानुसार, येस बँकेची मालमत्ता पुनर्रचना युनिट JC Flowers ARC आणि सुभाष चंद्रा यांच्यात 6500 कोटी रुपये थकबाकी कर्जाची पुर्तता करण्यासाठी करार झाला आहे. काल सोमवार दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी येस बँकचे शेअर्स 7.78 टक्के वाढीसह 18.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी (०५ सप्टेंबर : सकाळी) सुद्धा येस बँक शेअर 1.08 टक्के (NSE) वाढीसह 18.80 रुपयांवर ट्रेड करत आहे.
मागील आठवड्यात शुक्रवारी येस बँकचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. येस बँकेच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षी 14 डिसेंबर 2022 रोजी येस बँकचे शेअर्स 24.75 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. 14 डिसेंबर 2022 रोजी हा स्टॉक 42 टक्क्यांच्या घसरणीसह 14.40 रुपये किमतीवर आला होता. आता अवघ्या 6 महिन्यांत येस बँकच्या शेअरमध्ये 20 टक्के सुधारणा पाहायला मिळाली आहे.
भारतीय ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या तज्ञांच्या मते, येस बँकेचे शेअर्स टेक्निकल चार्टवर मजबूत पाहायला मिळत आहेत. येस बँक स्टॉक 20 दिवसा, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज किमतीवर ट्रेड करत आहे. तथापि 17.7 रुपये, 18.1 रुपये आणि 18.6 रुपये किमतीवर स्टॉकमध्ये मजबूत प्रतिरोधक पाहायला मिळत आहे.
रेझिस्टन्स लेव्हल म्हणजे, एक ठराविक किंमत पातळी जी ओलांडल्यानंतर शेअर्समध्ये आणखी वाढ पाहायला मिळू शकते. डाउनसाइडवर येस बँकच्या स्टॉकमधे 16.8 रुपये, 16.3 रुपये आणि 15.9 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		