9 May 2024 10:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्स गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आली, शेअर्सची जोरदार खरेदी, नेमकी बातमी काय?

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. ब्रिटिश सरकार आणि टाटा स्टीलमध्ये महत्त्वाची बोलणी सुरू असल्याची बातमी येताच टाटा स्टॉक तेजीत धावू लागला आहे. ब्रिटिश सरकार टाटा स्टील कंपनीला 500 दशलक्ष पौंड निधी देण्यास तयार झाली आहे.

यातील 700 दशलक्ष पौंड टाटा स्टीलच्या साउथ वेल्समधील पोर्ट टॅलबोट स्टीलवर्क कंपनीमध्ये गुंतवले जाणार आहे. काल सोमवार दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 3.97 टक्के वाढीसह 132.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी (०५ सप्टेंबर : सकाळी) सुद्धा टाटा स्टील शेअर 0.38 टक्के (NSE) घसरणीसह 131.25 रुपयांवर ट्रेड करत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार ब्रिटिश अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की, टाटा स्टील कंपनी आणि ब्रिटीश स्टील, या दोन सर्वात मोठ्या स्टील निर्मात्या कंपन्या इलेक्ट्रिक आर्क फर्नेसेसमधून अधिक इको फ्रेंडली पद्धतीने स्टील उत्पादन करण्यासाठी ब्रिटिश सरकारकडून भांडवलाची मागणी करत होते. याबाबत दोन्ही कंपन्यांनी ब्रिटिश सरकारकडे वारंवार मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात होते.

टाटा स्टील कंपनीने पर्यावरण पूरक स्टील प्लांट उभारण्यासाठी आणि सर्व भांडवली बाबींची पूर्तता करण्यासाठी ब्रिटिश शासनाकडे मागणी केली होती. या नवीन प्रकारच्या स्टील भट्ट्यांमध्ये जास्त कामगार लागत नाही. अशा स्थितीत ब्रिटनमधील टाटा स्टील प्लांटमधील कर्मचाऱ्यांची संख्या कमी होण्याची भीती व्यक्त केली जात होती.

ब्रिटनमध्ये टाटा स्टील कंपनी आपल्या विविध स्टील प्लांटच्या माध्यमातून 8,000 लोकांना रोजगार देते. मात्र भविष्यात हा कर्मचाऱ्याचा आकडा कमी होण्याची शक्यता आहे. पुढील काळात ब्रिटनमधील टाटा स्टील प्लांटमधून 3,000 पेक्षा अधिक लोकांना कामावरून काढले जाऊ शकते.

टाटा स्टील कंपनीने यापूर्वी ब्रिटिश सरकारला इशारा दिला होता की, जर यूके सरकारने टाटा स्टील कंपनीला पर्यावरण पूरक स्टील प्लांट उभारण्यास भांडवली सपोर्ट केले नाही तर टाटा स्टील कंपनीला त्यांच्या ब्रिटनमधील साइट्स बंद करण्याचा विचार करावा लागेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price today on 05 September 2023.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x