
Zensar Share Price | नुकताच झेन्सार टेक्नॉलॉजी कंपनीने आपले 2023-24 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. जून तिमाहीमध्ये झेन्सार टेक्नॉलॉजी कंपनीने जबरदस्त कामगिरी केली आहे. या कालावधीत झेन्सार टेक्नॉलॉजी कंपनीच्या निव्वळ नफ्यात 31 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. एप्रिल 2023 ते जून 2023 मध्ये झेन्सार टेक्नॉलॉजी कंपनीने 156.20 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. (Zensar Technologies Share Price)
मार्च 2023 तिमाहीत झेन्सार टेक्नॉलॉजी कंपनीने 119.20 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक निकाल जाहीर करताच गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झेन्सार टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 472.85 रुपये किमतीवर पोहोचले होते. शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी झेन्सार टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 4.02 टक्के वाढीसह 480.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
आर्थिक कामगिरी :
जून 2023 तिमाहीत झेन्सार टेक्नॉलॉजी कंपनीच्या निव्वळ नफ्यात 108 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. झेन्सार टेक्नॉलॉजी कंपनीने मागील आर्थिक वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत निव्वळ नफ्यात 108 टक्के वाढ नोंदवली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा झेन्सार टेक्नॉलॉजी कंपनीने 75.1 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जून 2023 तिमाहीत झेन्सार टेक्नॉलॉजी कंपनीने 1227.20 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मार्च 2023 तिमाहीच्या तुलनेत कंपनीची प्रति शेअर कमाई 5.27 रुपयेवरून वाढून 6.90 रुपयेवर पोहचली आहे.
झेन्सार टेक्नॉलॉजीज शेअर कामगिरी :
मागील एका महिन्यात झेन्सार टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 24.78 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत झेन्सार टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 116.98 टक्के नफा कमावून दिला आहे. झेन्सार टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पटली किंमत 493.70 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 380.25 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.