30 April 2024 3:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून स्टॉकची सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर, अवघ्या 2 दिवसात दिला 40 टक्के परतावा, खरेदी करणार? RVNL Share Price | PSU शेअर मजबूत कमाई करून देतोय, अल्पावधीत 2200% परतावा दिल्यानंतर पुन्हा तेजीत येणार
x

Stock in Focus | या शेअरने 1 दिवसात 20% उसळी घेताच खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, वाचा स्टॉक डिटेल्स

Stock In Focus

Stock In Focus | काल शेअर बाजारात किंचित तेजी पाहायला मिळाली होती, त्याच्या फायदा घेत Easy Trip Planners कंपनीच्या शेअरने 20 टक्क्यांची उसळी घेतली आणि शेअर अप्पर सर्किटवर 54.70 रुपयांवर ट्रेड करत होते. कंपनीने आपल्या शेअर होल्डर्ससाठी EMTFAMILY विशेष कार्यक्रम जाहीर केल्यानंतर शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. स्टॉक 45.60 रुपयांच्या मागील बंदच्या तुलनेत 19.85 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर लागून 54.65 रुपयांवर पोहचला होता. आज मात्र शेअर मध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. आणि शेअर सध्या 1.83 टक्क्यांची घसरणीसाह 53.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Easy Trip Planners Share Price | Easy Trip Planners Stock Price | BSE 543272 | NSE EASEMYTRIP)

कंपनीची ऑफर काय आहे? :
Easy Trip Planners कंपनीने जाहीर केले आहे की, Easy Trip Planners चे शेअर धारक रेफर नाऊ आणि अर्न फॉरएव्हर ‘ प्रोग्राममध्ये रजिस्टर होऊ शकतात. या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्म कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की,” Easy Trip Planners वेबसाइट किंवा मोबाइल अॅप्लिकेशनवरून नवीन वापरकर्त्याची बुकिंग करण्यासाठी रेफररला फ्लाइट, हॉटेल्स, हॉलिडे, बस आणि ट्रेन बुकिंगवर एक वर्षाच्या कालावधीसाठी आकर्षक कॅशबॅक आणि डिस्काउंट उपलब्ध करून दिले जातील. या ऑफर अंतर्गत विशेष फायदे मिळवण्यासाठी शेअर धारक ‘EMTFAMILY’ कूपन कोड आणि त्यांचे पॅन तपशील नमूद करावे लागेल. काही ऑफर्समध्ये विविध उड्डाणे आणि हॉटेल्सचे विशेष भाडे, हॉटेलमध्ये अतिरिक्त मुक्काम आणि वैद्यकीय कारणास्तव परतावा यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

कंपनी बद्दल थोडक्यात :
EaseMyTrip कंपनीचा IPO मागील वर्षी BSE इंडेक्सवर लिस्ट झाला होता. आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत असून शेअर लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. EaseMyTrip कंपनीच्या शेअरमध्ये 2022 या वर्षात 73.50 रुपये या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत मजबूत पडझड झाली आहे. डिसेंबर 2021 मध्ये या कंपनीचा शेअर 30.79 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 77.66 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअरमध्ये 2.58 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली होती. वर्ष-दर-वर्ष आधारावर स्टॉकमध्ये 79.62 टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे. हा शेअर 14 दिवसीय सापेक्ष शक्ती निर्देशांक 40.79 या मूल्यांवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या स्टॉकचे प्राइस-टू-इक्विटी म्हणजेच P/E गुणोत्तर 7.71 आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Easy Trip Planners Share price was increasing and touched Upper Circuit on before 27 December 2022.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x