
Zomato Share Price | झोमॅटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत झोमॅटो कंपनीने 138 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत झोमॅटो कंपनीला 34.7 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. झोमॅटो कंपनीच्या निव्वळ नफ्यात तिमाही QoQ आधारे 283 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी झोमॅटो स्टॉक 2.78 टक्के वाढीसह 148.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
सेबीला दिलेल्या माहितीनुसार झोमॅटो लिमिटेड कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत 3288 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 1948 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या तिमाहीत झोमॅटो कंपनीचा एकूण खर्च 3383 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत झोमॅटो कंपनीचा खर्च 2,485 कोटी रुपये होता.
झोमॅटो कंपनीने आपल्या तिमाही निकालात दिलेल्या माहितीनुसार, पुरुष क्रिकेट विश्वचषकादरम्यान लोकांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर केले होते. वर्ल्ड कप 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला होता. याशिवाय दिवाळी आणि नवीन वर्षाच्या काळात देखील खाद्य पदार्थांची मोठी मागणी वाढली होती. यामुळे झोमॅटो कंपनीच्या कमाईत मजबूत भर पडली आहे. सकारात्मक तिमाही निकाल जाहीर केल्यामुळे कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झोमॅटो स्टॉक 3 टक्क्यांच्या वाढीसह 147.45 रुपये किमतीवर पोहचला होता.
मार्च 2023 मध्ये झोमॅटो कंपनीचे शेअर्स 49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स आता 150 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहेत. झोमॅटो कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,25,437.19 कोटी रुपये आहे. परकीय ब्रोकरेज फर्म CLSA ने झोमॅटो कंपनीच्या शेअर्सवर 168 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.