वृत्तपत्र उद्योगाला प्रचंड तोटा; २ महिन्यांत ४,००० कोटींचे नुकसान
नवी दिल्ली, ३ मे: यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने देखील जगाला सज्ज राहण्याच्या इशारा दिला होता. जगभरातील देशांना कोरोना विषाणूने घेरले आहे. याचदरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) प्रमुख ख्रिस्टिलिना जार्वीवा यांनी जगाला १९३० मधील महामंदीनंतरच्या सर्वांत वाईट आर्थिक घसरणीचा सामना करावा लागण्याची शक्यता असल्याचे म्हटले होतं. २०२० मध्ये जागतिक विकास वेगाने नकारात्मक होईल आणि १७० हून अधिक देशातील व्यक्तींची उत्पन्न वाढ त्याच दिशेने मार्गक्रमण करेल, असेही त्यांनी म्हटले होते.
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील आर्थिक उलाढाल अचानक ठप्प झाली आहे. यामुळे बाजारांना उभारी देण्यासाठी २५०० अब्ज डॉलरची आर्थिक गुंतवणूक करण्याची गरज आहे. हा आकडा कमी आहे. आतापर्यंत ८० हून अधिक देशांनी IMFकडे आपत्कालीन मदतीची मागणी केली आहे. कोरोना व्हायरस नावाच्या महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका बसला आहे आणि विकसनशील देशांना मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे, असे जॉर्जीव्हा म्हणाल्या होत्या. “जागतिक अर्थव्यवस्था अचानक थांबल्याने अनेक कंपन्या दिवाळखोर होण्याची आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याचीही लाट येईल ही प्रमुख चिंता आहे. त्यामुळे उदयोन्मुख बाजारपेठांना जवळपास २.५ ट्रिलियन डॉलरची गरज आहे. पण, ८० पेक्षा अधिक देशांनी आधीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे आपात्कालीन मदतीची विनंती केली आहे.
दरम्यान, भारतात देखील अनेक क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसल्याने त्या क्षेत्रातील उद्योग टिकवणं देखील अशक्य होणार असल्याचं तज्ज्ञांनी यापूर्वीच म्हटलं आहे. त्यानुसार भारतात कोरोना विषाणूच्या साथीमुळे संकटात सापडलेल्या वृत्तपत्र उद्योगाचे गेल्या दोन महिन्यांत चार हजार कोटींचे नुकसान झाले असून सरकारने आर्थिक मदत दिली नाही तर हा उद्योग डबघाईस येणार आहे. तसेच पुढील सहा-सात महिन्यांत हे नुकसान १५ हजार कोटींपर्यंत जाणार आहे, असे इंडियन न्यूजपेपर सोसायटीने माहिती व प्रसारण मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
आयएनएसने म्हटले आहे, की वृत्तपत्र उद्योगात तीस लाख कामगार व कर्मचारी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष काम करीत असून त्यात पत्रकार, मुद्रक, विक्रेते व इतरांचा समावेश आहे. आयएनएस ही संस्था एकूण ८०० वृत्तपत्रांचे प्रतिनिधित्व करते. या संस्थेच्या अंदाजानुसार वृत्तपत्र उद्योगातून ९ ते १० लाख लोकांना प्रत्यक्ष व १८-२० लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. गेल्या काही आठवडय़ांत वृत्तपत्रांची आर्थिक स्थिती खालावली असून त्यांना कर्मचाऱ्यांचे वेतन देणे अवघड झाले आहे.
सरकारने वृत्तपत्र कागदावरचे पाच टक्के सीमा शुल्क रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. वृत्तपत्रनिर्मिती खर्चात ४० ते ५० टक्केभाग वृत्तपत्र कागदावर खर्च होत असतो. पाच टक्के शुल्क काढून टाकले तर त्याचा देशी उत्पादकांवर काही परिणाम होणार नाही व त्याचा फटका मेक इन इंडियाला बसणार नाही. सरकारने वृत्तपत्रांना दोन वर्षे करसुटी जाहीर करावी, तसेच सरकारी जाहिरातींचे दर पन्नास टक्के वाढवून द्यावेत. मुद्रित माध्यमासाठीची तरतूद १०० टक्के वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे.
News English Summary: The newspaper industry in India, which has been hit hard by the corona virus, has lost Rs 4,000 crore in the last two months and will go bankrupt if the government does not provide financial assistance. In the next six to seven months, the loss will reach Rs 15,000 crore, the Indian Newspaper Society said in a letter to the Ministry of Information and Broadcasting.
News English Title: Story Indians Newspaper Industry Loses rupees 4000 Crore In 2 Months News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Card | क्रेडिट कार्डबद्दल समोर आली मोठी अपडेट; कार्डची एक्सपायरी कशी चेक कराल, इथे जाणून घ्या सविस्तर माहिती