 
						Zomato Share Price | झोमॅटो या ऑनलाईन फूड डिलिव्हरी एग्रीगेटर प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. चालू आठवड्याच्या पहिल्या दिवशी झोमॅटो स्टॉक 6 टक्क्यांच्या वाढीसह 96 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र नंतर प्रॉफिट बुकींगमुळे शेअरची किंमत 92 रुपयेपर्यंत खाली घसरली होती. आज मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 2.44 टक्के वाढीसह 94.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
स्टॉकमधील उसळीचे कारण काय?
झोमॅटो कंपनीच्या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, झोमॅटो कंपनीचे 3.2 कोटी शेअर्स ज्याचे मूल्य 288 कोटी रुपये आहे, ते ब्लॉक डीलद्वारे तीन मोठ्या व्यवहारांमध्ये अधिग्रहण करण्यात आले आहेत. ही डील 90.1 रुपये प्रति शेअर या किमतीवर पूर्ण झाली आहे. तथापि या ब्लॉक डीलमधील खरेदीदार आणि विक्रेता यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र मीडिया रिपोर्टनुसार जपानी टेक कंपनी सॉफ्टबँक लवकरच ब्लिंकिट डीलचा लॉकइन कालावधी संपल्यावर झोमॅटोमधील आपले शेअर्स विकू शकते.
शेअरची कामगिरी आणि परतावा
2023 या वर्षात झोमॅटो कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत S&P BSE सेन्सेक्समध्ये फक्त 6 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. 7 ऑगस्ट 2023 रोजीच झोमॅटो कंपनीचे शेअर्स 102.85 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. झोमॅटो कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 च्या जून तिमाहीत पहिल्यांदा प्रॉफिट कमाई केली आहे.
मागील वर्षी जून तिमाहीत या कंपनीला 186 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. तर आता जून 2023 तिमाहीत कंपनीने 2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. त्याच वेळी ऑपरेशनल महसूल मागील वर्षीच्या तुलनेत 71 टक्के वाढीसह 2,416 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी कंपनीने फक्त 1,414 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		