12 December 2024 1:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Vikas EcoTech Share Price | 2 रुपये 85 पैशाचा विकास इकोटेक शेअर 'या' बातमीने तुफान तेजीत येणार, पेनी शेअर देणार मोठा परतावा?

Vikas EcoTech Share Price

Vikas EcoTech Share Price | भारतीय बाजारात विक्रीचा दबाव आणि अस्थिरता असताना सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 3.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअरमधे 5 टक्के लोअर सर्किट लागला आहे. नुकताच या स्मॉलकॅप कंपनीच्या संचालक मंडळाने प्रेफ्ररंस शेअर्सच्या माध्यमातून 35 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

गुरुवार दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. आज मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी विकास इकोटेक कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीसह 2.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कर्जमुक्त होण्याकडे वाटचाल

नुकताच विकास इकोटेक कंपनीने जाहीर केले होते की, या चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी विकास इकोटेक कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त होईल. हा कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, कंपनीने आतापर्यंत 101.20 कोटी रुपये कर्ज कमी केले आहे. सध्या कंपनीवर फक्त 60 कोटी रुपये कर्ज शिल्लक आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी कंपनी 10 कोटी रुपये कर्ज परतफेड करेल.

परकीय गुंतवणुकीचे आगमन

नुकताच मॉरिशस स्थित परिकिय संस्थागत गुंतवणूकदार कंपनी एजी डायनॅमिक फंड्स लिमिटेडने विकास इकोटेक कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. विकास ग्लोबल फंड पीसीसी, युब्लिया कॅपिटल पार्टनर्स फंड- । आणि कॅलिप्सो ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फंड या दोन परकीय गुंतवणूकदारांनी देखील विकास इकोटेक कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे.

विकास इकोटेक कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती कळवले आहे की, विकास इकोटेक कंपनीच्या निधी उभारणी समितीने कंपनीचे 8,04,00,000 शेअर्स मॉरिशस स्थित FII ला इश्यू केले आहेत. यासह 8,03,00,000 शेअर्स ग्रोथ ग्लोबल फंड PCC Yubilia Capital Partners Fund ला इश्यू करण्यात आले आहेत. आणि निधी उभारणी समितीने कॅलिप्सो ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फंडला देखील 1,78,00,000 शेअर्स इश्यू केली असल्याची माहिती सेबीला दिली आहे. विकास इकोटेक कंपनीने वरील संस्थांना शेअर्स 2.80 रुपये शेअर किमतीवर इश्यू केले आहेत. याचा अर्थ विकास इकोटेक कंपनीला FII गुंतवणुकीतून एकूण 49.98 कोटी रुपये भांडवल प्राप्ती झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas EcoTech Share Price today on 29 August 2023.

हॅशटॅग्स

#Vikas Ecotech Share Price(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x