15 May 2024 10:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Old Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंत भरा ITR, किती फायदा होईल पहा Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये अप्पर सर्किट मालिका, शेअरची किंमत उच्चांक पातळीवर पोहचली, पुढची टार्गेट प्राईस पहा

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 23.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपली 8 वर्षांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. (Suzlon Energy Share Price)

आज देखील या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागला आहे. आज सुझलॉन कंपनीच्या शेअरने आपली नवीन 52 आठवड्यांची उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. आज मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4.89 टक्के वाढीसह 24.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

1 वर्षात 217 टक्के परतावा

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 217 टक्के परतावा कमावून दिला आहे. 29 ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 28 ऑगस्ट 2023 रोजी 23.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांत तब्बल 187 टक्के मजबूत झाले असून गुंतवणूकदारांनी बक्कळ कमाई केली आहे. 28 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 24 रुपयेच्या पार गेला आहे. ब्रोकरेज हाऊस जेएम फायनान्शियलचे तज्ञ सुझलॉन एनर्जी स्टॉकवर उत्साही पाहायला मिळत आहेत.

टार्गेट प्राईस

शेअर बाजारातील दिग्गज तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकवर 30 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. ब्रोकरेज हाऊसने सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. सुझलॉन एनर्जी शेअर्सवर जेएम फायनान्शिअलने 30 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स पुढील काळात सध्याच्या किमतीच्या तुलनेत 30 टक्के जास्त वाढू शकतात. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 6.60 रुपये होती.

नवीन प्रकल्प तपशील

नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीला टेक ग्रीन पॉवर XI कडून 201.6 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याची ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर देणारी कंपनी O2 पॉवर कंपनीची उपकंपनी आहे. या प्रकल्पाद्वारे एकूण 166000 घरांना वीजपुरवठा करण्याची योजना आखण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पामुळे वार्षिक 655000 टन CO2 उत्सर्जन मध्ये घट होणार आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीला पवन टर्बाइनचा पुरवठा करणे आणि प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मिळाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 29 August 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x