
Gold Price Today | मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सराफा बाजारातही घसरण पाहायला मिळाली. सराफा बाजारा बरोबरच मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्येही (एमसीएक्स) आज घसरण दिसून येत आहे. याआधी मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली होती, मात्र आता घसरणीमुळे दागिने खरेदीचा विचार करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. तज्ज्ञांचा अंदाज आहे की, सोन्याचा भाव लवकरच वाढून 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचेल. त्याचप्रमाणे चांदी 80,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
सोने आणि चांदी दोन्हीमध्ये घसरण
आज म्हणजे बुधवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) बद्दल बोलायचे झाले तर सोन्यात घसरण झाली तर चांदीमध्ये किंचित वाढ दिसून आली. एमसीएक्सवर बुधवारी सोने आणि चांदीमध्ये संमिश्र ट्रेंड पाहायला मिळत आहे. दुपारी चांदीच्या दरात 30 रुपयांनी वाढ झाली असून ती 77486 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे. याशिवाय सोन्याचा भाव 170 रुपयांच्या घसरणीसह 61249 रुपयांवर व्यवहार करताना दिसला. याआधी मंगळवारी सोने 61419 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 77456 रुपये प्रति किलो वर बंद झाली होती.
सराफा बाजारातील दर
इंडिया बुलियन्स असोसिएशनने सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत. बुधवार दुपारी 12 वाजता सोनं 103 रुपयांनी घसरून 61430 रुपये प्रति 10 ग्राम आणि चांदी 48 रुपयांनी घसरून 76351 रुपये प्रति किलोग्राम वर आली आहे. याआधी मंगळवारी चांदी 76399 रुपये आणि सोनं 61533 रुपयांवर बंद झालं होतं.
आज बुधवारी बुधवारी 23 कॅरेट सोन्याचा भाव 61,185 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 56,269 रुपये आणि 20 कॅरेट सोन्याचा भाव 46072 रुपये प्रति 10 ग्राम वर पोहोचाल आहे. दरम्यान, दिवाळीत सोन्याचा भाव 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 80,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो.
तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर :
* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५६९५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६२१३० रुपये
* भिवंडी – २२ कॅरेट सोने : ५६९८० रुपये, २४ कॅरेट सोने : ६२१६० रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५६९५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६२१३० रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 56980 रुपये, 24 कॅरेट सोने : 62160 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 56950 रुपये, 24 कॅरेट सोने : 62130 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५६९५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६२१३० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५६९८० रुपये, २४ कॅरेट सोने : ६२१६० रुपये
* पुणे – २२ कॅरेट सोने : ५६९५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६२१३० रुपये
* सोलापूर – २२ कॅरेट सोने : ५६९५० रुपये, २४ कॅरेट सोने : ६२१३० रुपये
* वसई-विरार – २२ कॅरेट सोने : ५६९८० रुपये, २४ कॅरेट सोने : ६२१६० रुपये
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.