
Gold Price Today | गेल्या काही दिवसांत सोने-चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाल्यानंतर आता या दोन्ही धातूंमध्ये पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात असेच चढ-उतार सुरू आहेत. बुधवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे चांदीचे दरही ७२ हजारांच्या खाली आहेत. काही दिवसांपूर्वी चांदीचा भाव ७४ हजारांच्या वर तर सोन्याचा भाव ६१ हजारांच्या वर होता.
सराफा बाजारात मोठी घसरण
सराफा बाजाराचा दर दररोज जाहीर केला जातो. बुधवारी जाहीर झालेल्या दरानुसार सोन्याचा भाव ५०० रुपयांनी घसरून ६०६१८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर चांदी सुद्धा 200 रुपयांनी घसरून 71739 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचली आहे. याआधी मंगळवारी चांदीचा भाव 71930 रुपये आणि सोन्याचा भाव 61066 रुपयांवर बंद झाला होता.
आज 23 कॅरेट सोन्याचा भाव 60375 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव ६०६१८ रुपये झाला आहे. गेल्या काही काळापासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. फेब्रुवारीमहिन्यात सोने 55,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास होते. अवघ्या अडीच महिन्यांत त्यात प्रति दहा ग्रॅम ६००० रुपयांची वाढ झाली आहे.
एमसीएक्स’वर सोन्याची स्थिती
जर तुम्ही सोने-चांदी किंवा त्यापासून बनवलेले दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आता कमी पैसे खर्च करावे लागतील. बुधवारी सराफा बाजारात घसरण दिसून येत असून मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये (एमसीएक्स) संमिश्र कल दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या भावाने उच्चांक प्रस्थापित केला आहे. यंदा दिवाळीच्या हंगामात सोन्याचा भाव ६५,००० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत वाढू शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तर चांदीचा भाव 80,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
तुमच्या शहरातील आजचे नवे दर
* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५६३०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१४२० रुपये
* भिवंडी – २२ कॅरेट सोने : ५६३३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१४५० रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५६३०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१४२० रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 56330 रुपये, 24 कॅरेट सोने : 61450 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 56300 रुपये, 24 कॅरेट सोने : 61420 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५६३०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१४२० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५६३३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१४५० रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 56300 रुपये, 24 टक्के कॅरेट : 61420 रुपये
* सोलापूर – 22 कॅरेट सोने : 56300 रुपये, 24 कॅरेट सोने : 61420 रुपये
* वसई-विरार – २२ कॅरेट सोने : ५६३३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१४५० रुपये
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.