15 December 2024 4:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 7 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
x

Multibagger Stocks | हा शेअर 45 टक्के पेक्षा जास्त कोसळला, आता दुप्पट वाढ होणार, 1950 टक्के लाभांश जाहीर

Multibagger stock, vedanta share price,

Multibagger Stocks | वेदांता कंपनीच्या शेअर मध्ये बरीच पडझड झाल्यानंतर आता कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ होताना दिसेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 45% पडल्यावर वेदांताचे शेअर्स आता १००% पर्यंत वाढू शकतात असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. वेदांता कंपनीच्या संचालक मंडळाने प्रत्येक शेअरवर 1950% लाभांश देण्याचे घोषित केले आहे.

तज्ञांचे अंदाज आणि टार्गेट प्राईस:
गेल्या काही महिन्यांपासून कमोडिटी मार्केट मध्ये धातूची पडलेली किंमत आणि धातू व्यवसायातील लार्ज कॅप कंपनीचे शेअर्स मध्ये होत असलेल्या पडझडीचे परिमाण म्हणून वेदांता कंपनीचा शेअर 45% कोसळला होता. 11 एप्रिल 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर वेदांताचे शेअर्स 440.75 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीवर ट्रेड करत होते. वेदांताचे शेअर्स मागील 3 महिन्यांत 45% पेक्षा जास्त घसरले आहेत, 19 जुलै 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 238.60 रुपयांवर ट्रेड करत होते. आता पुढील काळात कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे आणि येत्या काळात वेदांताचे शेअर्स १००% पर्यंत वाढू शकतात असा अंदाज गुंतवणूक तज्ञ व्यक्त करतात. दरम्यान, वेदांता कंपनीच्या संचालक मंडळाने प्रती शेअर 1950% टक्के लाभांश म्हणजे Dividend देण्याची घोषणा केली आहे.

वेदांता शेअर्सचे पुढील टार्गेट प्राईस 490 रुपयांचे
आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी आणि प्रसिद्ध विदेशी ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गनने वेदांत लि.च्या शेअर्सला ओव्हरवेट रेटिंग दिले आहे. ब्रोकरेज हाऊसने कंपनीच्या शेअर्ससाठी पुढील काळात 490 रुपये लक्ष्य किंमत गाठण्याचा आंदाज वर्तवला आहे. म्हणजेच, कंपनीचे शेअर्स सध्याच्या शेअरच्या किंमतीपेक्षा 100% पेक्षा जास्त वाढू शकतात. ब्रोकरेज हाऊसने सांगितले की झिंक इन्व्हेंटरी मागील दहा वर्षाच्या नीचांक पातळीवर पोहोचली आहे आणि वेदांता लिमिटेड कंपनी उच्च एलएमई झिंक किमतींचा फायदा घेण्यासाठी चांगल्या स्थितीत आहे. सध्या वेदांता लिमिटेडचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक पातळीवर म्हणजेच रु. 206.10 ट्रेड करत आहे.

लाभांश आणि रेकॉर्ड तारीख:
प्रति शेअर 19.50 रुपये लाभांश देणार्‍या वेदांता लिमिटेडने एक्सचेंजला कळवले आहे की कंपनीच्या संचालक मंडळाने 19 जुलै 2022 रोजी झालेल्या बैठकीत 2022-23 या आर्थिक वर्षासाठी दुसरा अंतरिम लाभांश मंजूर केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने घोषित केल्याप्रमाणे प्रत्येक शेअरवर 1950 टक्के (रु. 19.50 प्रति शेअर) अंतरिम लाभांश देणार आहे. कंपनीने 27 जुलै 2022 ही अंतरिम लाभांशाची रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे असे एक्सचेज ला दिलेल्या अहवालात म्हंटले आहे. मेटल सेगमेंट मधील या दिग्गज कंपनीने यापूर्वी चालू आर्थिक वर्षात 3150% (प्रति शेअर 31.50 रुपये) चा पहिला अंतरिम लाभांश दिला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Multibagger Stocks in metal segment Vedanta share price and dividend on 20 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x