1 May 2025 6:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL
x

Gold Price Updates | सोन्याच्या दरवाढीचा काय परिणाम होतोय, लग्नाच्या सीझनमध्येही लोकांचा कल बदलतोय?

Gold Price Updates

Gold Price Updates | भारतात लोक भरपूर सोनं विकत घेतात. लोक सोने खरेदी करणे खूप शुभ मानतात आणि हे अनेक परंपरांशी देखील संबंधित आहे. अनेकदा सणासुदीला लोक सोनं विकत घेऊन आपल्या घरी आणतात. मात्र, सोने खरेदी करणेही खूप महाग असून त्याचे दरही हळूहळू वाढत आहेत. त्याचबरोबर भारतातही सोन्याच्या किंमतींनी विक्रमी पातळी गाठली आहे, ज्यामुळे त्याच्या मागणीवरही परिणाम झाला आहे.

सोन्याची मागणी घसरली
भारतात गुंतवणुकीच्या दृष्टीनेही लोक सोने खरेदी करतात. दरम्यान, वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (डब्ल्यूजीसी) माहितीनुसार, जानेवारी ते मार्च या तिमाहीत भारताची सोन्याची मागणी १७ टक्क्यांनी घसरून ११२.५ टनझाली आहे. वास्तविक सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने त्याच्या मागणीत घसरण दिसून आली आहे. सोन्याचे दर विक्रमी पातळीवर गेल्याने आणि किमतीतील प्रचंड चढ-उतारामुळे ही घसरण झाली.

सोन्याच्या किंमतीतील अस्थिरता
डब्ल्यूजीसीच्या सोन्याच्या मागणीच्या ट्रेंडनुसार, 2022 मध्ये याच तिमाहीत एकूण सोन्याची मागणी 135.5 टन होती. डब्ल्यूजीसीचे प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत) सोमसुंदरम पीआर यांनी सांगितले की, 2023 च्या पहिल्या तिमाहीत भारताची सोन्याची मागणी 17 टक्क्यांनी घसरून 112.5 टन झाली आहे. विक्रमी पातळीवर भाववाढ आणि अस्थिरतेमुळे हे घडले.

सोन्याचा भाव
याचा परिणाम बाजारावर झाला आणि सोन्याच्या दागिन्यांची मागणी २०२२ च्या पहिल्या तिमाहीतील ९४.२ टनांवरून जानेवारी-मार्च २०२३ मध्ये ७८ टनांवर आली. तर भारतात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 62 हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे लग्न कार्याच्या सीझनमध्ये सुद्धा लोकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवल्याचं म्हटलं जातंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Updates on 06 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gold Price Updates(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या