28 March 2023 1:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | काय म्हणता? व्होडाफोन आयडिया कंपनी बंद होणार? कंपनीचे शेअर्स आणखी खोलात गेले, पुढे काय? TTML Share Price | टाटा ग्रूपच्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स कधी वाढणार? आतापर्यंत शेअरची कामगिरी कशी होती? सविस्तर माहिती EPF Interest Rate Hike | नोकरदारांसाठी खुशखबर! ईपीएफ व्याज दर वाढवले, आता किती फायदा मिळणार पहा Income Tax Cash Rules | बापरे! आता 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेच्या खरेदीवर कागदपत्रे द्यावी लागणार VIDEO | भ्रष्टाचार दडविण्यासाठी लोकशाही ताब्यात घेण्याचा प्रयन्त, मोदींच्या मित्राने कायदाच बदलला, इस्रायली पंतप्रधांच्या अटकेसाठी जनता रस्त्यावर IRCTC Confirmed Train Ticket | तिकिटचे टेन्शन नाही! रेल्वेत बुकिंगवेळी कन्फर्म सीट मिळेल, बुकिंग करताना काय करावं पहा Tax Exemption Claim | तुमच्या पगारात DA, TA, HRA सह इतर अनेक भत्ते असतात, कशावर किती टॅक्स सूट मिळते पहा
x

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 3 बचत योजना ज्या देतील सुरक्षिततेसह जबरदस्त परतावा, सरकारी हमी आणि अनेक सवलतही

Post Office Scheme

Post Office Scheme | महागाई आणि जागतिक अस्थिरतेने बाजारात प्रचंड मोठ्या प्रमाणत निराश निर्माण केली आहे. सर्वजण आपला पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक हमखास परतावा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वांना आपल्या गुंतवणुकीवर सुरक्षित परतावा हवा आहे, पण बाजारातील अस्थिर परिस्थिती अशी संधी देत नाही. तथापि, अशा खूप कमी योजना आहेत ज्या आपल्या गुंतवणूकदारांना नियमित आणि सुरक्षित परतावा मिळवून देऊ शकतात. अश्या योजनेत गुंतवणुक केल्यास पैसे गमावण्याचा धोका नसतो.

3 गुंतवणूक योजनांबद्दल माहिती :
आज या लेखात आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफीसच्या अशा 3 गुंतवणूक योजनांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यात तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला हमखास परतावा मिळवून देतील. इंडिया पोस्ट आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन गुंतवणूक योजना सुरू करत असते, आणि पोस्टच्या योजनेत परतावाही चांगला मिळतो. कारण पोस्टातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधिक नसते आणि सरकारी ह्या गुंतवणुकीवर हमी देते. पोस्ट ऑफीस गुंतवणूक हे पैसे सुरक्षित गुंतवण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. इतकेच नाही तर पोस्ट ऑफीस दीर्घकाळात लहान बचत योजनांवर जबरदस्त परतावा देते. चला तर मग जाणून घेऊ, इंडिया पोस्टच्या तीन जबरदस्त गुंतवणूक योजनांबद्दल.

Post Office Recurring Deposit/पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट :
जर तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक रक्कम बचत करायची असेल आणि त्यावर चांगला परतावा हवा असेल,तर तुम्ही पोस्ट ऑफिस च्या RD स्कीम मध्ये बिनधास्त गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्हाला फक्त 5 वर्षांच्या मॅच्युरिटीसह गुंतवणूकीवर 5.8 टक्के व्याज परतावा दिला जाईल. तुम्ही RD योजनेत दर महिन्याला फक्त 100 रुपये जमा करू शकता. त्याच वेळी, या योजनेत गुंतवणूकीची कोणतीही उच्च मर्यादा नाही. तुम्ही हवी तेव्हढी रक्कम ह्या खात्यात जमा करू शकता.

Post Office Time Deposit/पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट :
पोस्ट ऑफिसची ही योजना FD म्हणजेच मुदत ठेव योजनेसारखीच आहे. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये गुंतवणुकीसाठी 1, 2, 3 आणि 5 वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या योजनेत 1 ते 3 वर्षांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 5.5 टक्के परतावा मिळेल. जर तुम्हाला जास्त परतावा हवा असेल तर तुम्ही 5 वर्षांसाठी एकरकमी गुंतवणूक करु शकता. दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला 6.7 टक्के व्याज परतावा मिळेल. TD योजनेतील गुंतवणुकीवर तुम्हाला तुम्हाला आयकर सवलतीचा ही लाभ घेता येईल. तुम्ही या योजनेत 1,000 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता.

National Saving Certificate/नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट :
या योजनेत लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा असतो. ही योजना तुम्हाला 6.8 टक्के परतावा मिळवून देऊ शकते. तुम्ही राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत किमान 1000 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर पाच वर्षा आधी तुम्ही या योजनेतून पैसे कधी शकणार नाही. या योजनेतील गुंतवणूकीवर तुम्हाला आयकर भरावा लागणार नाही. यातील गुंतवणूक आयकर कायद्यांतर्गत कर सवलतीसाठीही पात्र असेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Post Office Scheme for high returns and Investment benefits on 3 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x