 
						Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. आज सोन्याचा भाव 60,000 च्या खाली घसरला आहे. याशिवाय चांदीही स्वस्त झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर याबाबत माहिती मिळाली आहे. जागतिक बाजारपेठेतील किमती घसरल्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. (Gold Price Today)
आज सराफा बाजारात सोन्याचा दर किती?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज मंगळवारी सोन्याचा भाव 59334 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 59327 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज मंगळवारी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ७ रुपयांनी घसरला आहे.
सोनं उच्चांकी किंमतीपेक्षा 2,251 रुपयांनी स्वस्त झालं
सध्या सोन्याचा भाव उच्चांकी किंमतीपेक्षा 2,251 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते. तर चांदीचा भाव 71236 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 71925 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीच्या दरात प्रति किलो ६८९ रुपयांची घसरण झाली आहे.
एमसीएक्स’वर सुद्धा सोन्याचे दर घसरले
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 0.02 टक्क्यांनी घसरून 59,409 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. याशिवाय चांदीचा भाव 0.09 टक्क्यांनी घसरून 71201 रुपये प्रति किलो झाला आहे.
या नंबरवर पाहा दर
तुम्ही घरबसल्या सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, तुम्ही फक्त 8955664433 नंबरवर मिस्ड कॉल देऊन किंमत तपासू शकता. ज्या नंबरवरून तुम्ही मेसेज कराल त्याच नंबरवर तुमचा मेसेज येईल.
अॅपवरूनही शुद्धता तपासा
तुम्हीही बाजारात सोनं खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅपचा ही वापर करू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता की ते खरे की नकली. याशिवाय या अॅपच्या माध्यमातूनही तुम्ही तक्रार करू शकता.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		