
Gold Rate Today | सोने-चांदीच्या घसरणीनंतर गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सराफा बाजार आणि मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) मधील घसरणीमुळे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोने आणि चांदीमध्ये घसरण झाली आहे. मात्र, तत्पूर्वी गुरुवारच्या सत्रात सोन्या-चांदीत तेजी दिसून आली होती. (Gold Price Today)
एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या दरात घसरण
गुरुवारच्या तेजीनंतर शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये (एमसीएक्स) घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सोन्याचा भाव 232 रुपयांच्या घसरणीसह 59320 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेंड करताना दिसला. तर चांदी 286 रुपयांनी घसरून 75,163 रुपये प्रति किलोग्राम झाली आहे. याआधी गुरुवारी एमसीएक्सवर सोने 59552 रुपये आणि चांदी 75449 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
आज सराफा बाजारातही सोन्याचा दरात घसरण
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनतर्फे (आयबीजेए) सराफा बाजारातील दर दररोज जाहीर केले जातात. वेबसाइट https://ibjarates.com शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 59610 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर चांदीचा भाव जवळपास 900 रुपयांनी घसरून 74841 रुपये प्रति किलोग्राम वर आला आहे. गुरुवारी सोने 59,863 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 75,768 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. गुरुवारी 23 कॅरेट सोन्याचा भाव 59,623 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 44,700 रुपये होता.
आज तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या :
* औरंगाबाद, 22 टक्के सोने : 55400 रुपये, 24 टक्के सोने : 60440 रुपये
* भिवंडी, 22 ग्रॅम सोने : 55430 रुपये, 24 टक्के सोने : 60470 रुपये
* कोल्हापूर, 22 ग्रॅम सोने : 55400 रुपये, 24 टक्के सोने : 60440 रुपये
* लातूर, 22 ग्रॅम सोने : 55430 रुपये, 24 टक्के सोने : 60470 रुपये
* मुंबई, 22 टक्के सोने : 55400 रुपये, 24 टक्के सोने : 60440 रुपये
* नागपूर, 22 टक्के सोने : 55400 रुपये, 24 टक्के सोने : 60440 रुपये
* नाशिक, 22 टक्के सोने : 55430 रुपये, 24 टक्के सोने : 60470 रुपये
* पुणे, 22 ग्रॅम सोने : 55400 रुपये, 24 टक्के सोने : 60440 रुपये
* सोलापूर, 22 ग्रॅम सोने : 55400 रुपये, 24 टक्के सोने : 60440 रुपये
* ठाणे, 22 टक्के सोने : 55400 रुपये, 24 टक्के सोने : 60440 रुपये
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.