17 April 2021 1:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कडक संचारबंदीत लोक शिवथाळी खायला जाणार कसे? | पण शिवथाळीसाठी गर्दी | राम कदम तोंडघशी Alert | हवेतून वेगाने पसरतो कोरोना, 3 देशांतील तज्ञांना याचा ठोस पुरावा सापडला - लँसेट जर्नल १९-२० एप्रिल नंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल - डॉ. राजेंद्र शिंगणे Alert | एकूण रुग्णांपैकी 10% रुग्ण 11 ते 19 वयोगटातील तर 4.42% रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे केंद्राची कोविड रणनीती, पहिला टप्पा लॉकडाउन, दुसरा टप्पा घंटी वाजवणे, तिसरा टप्पा देवाचे गुण गा प्रेतं जळत होती तेव्हा साहेब निवडणुकीत 'जुमलेबाजी' करत होते... इतिहास साक्ष देईल - काँग्रेस महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे
x

शिवसेना सत्तेसाठी हिरवी झाल्यामुळेच......भाजपाची प्रतिक्रिया

MNS Maha Adhiveshan, MNS Chief Raj Thackeray, Amit Raj Thackeray, BJP Leader ganesh Hake

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनापासून राज ठाकरे हिंदुत्वाची भूमिका घेणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. महाविकास आघाडीमुळे शिवसेना हिंदुत्वावर मवाळ झालीय. तर आता मनसे कात टाकत हिंदुत्वावर आक्रमक होणार आहे. मनसेच्या नेत्यांनी त्यावर बोलायला सुरुवात केलीय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी तर एक पाऊल पुढे जात राज ठाकरे हे दुसरे हिंदुह्रदयसम्राट असतील असं मत व्यक्त केलं होतं. त्यावर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झालीय. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गणेश हाके यांनी गंभीर आरोप करत राज ठाकरेंच्या नव्या भूमिकेमागे एनसीपीचे अध्यक्ष शरद पवारांचं डोकं असल्याचा आरोप केलाय.

BhagyaVivah Marathi Matrimonial

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बदललेल्या झेंड्यामागे वेगळंच राजकारण असल्याचं हाकेंनी सांगितलं. ‘या सगळ्यामागे शरद पवारांचं डोकं आहे. शिवसेना सत्तेसाठी हिरवी झाली आहे. त्यामुळे हिंदूंची एकगठ्ठा मतं आता भारतीय जनता पक्षाकडे जाऊ शकतात. याच मतांचं विभाजन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांचा झेंडा बदलला आहे. या सगळ्यामागे शरद पवारांचा हात आहे. त्यांच्याकडूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंना प्रोत्साहन दिलं जात आहे,’ असा दावा हाकेंनी केला.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शाह यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमीच आपल्या भूमिकांवर ठाम राहिले. त्यांनी आपल्या विचारधारेशी कधीही तडजोड केली नाही, असंही अमित शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आणि शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला.

 

Web Title:  BJP Leader Ganesh Hake hits out NCP Chief Sharad Pawar after MNS unveils its New Flag.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(600)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x