1 May 2025 5:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT
x

बारक्याच्या खांद्यावर कोण बसलाय बघा..शेमड्या शिवसैनिकांना सांगा NCP'वर केस ठोकायला

BJP leader Nilesh Rane, Shiv Sena, Aaditya Thackeray, Baby Penguin

मुंबई, १७ जुलै : काल ट्विटरवर #BabyPenguin हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होता. यामध्ये ठाकरे सरकारची थेट मुघल राजशी तुलना करणाऱ्या एका सोशल मीडिया युजरविरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हा हॅशटॅग अधिकच ट्रेंड होऊ लागला होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, युवासेनेचे कायदेशीर सल्लागार धर्मेंद्र मिश्रा यांनी ट्विटर युजर समीत ठक्कर याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरच #BabyPenguin हा हॅशटॅग ट्रेंड होत होता. पण यामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव चर्चेत का आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता.

विशेष म्हणजे ज्या व्यक्तीमुळे हा ट्रेंड सुरु झाला आहे त्या व्यक्तीला म्हणजे समीत ठक्करला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा फॉलो करत असल्याने युवासेनेचे कायदेशीर सल्लागार धर्मेंद्र मिश्रा यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. समीत ठक्कर विरोधात व्ही पी रोड पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचं वृत्त आहे. तसेच समीत ठक्करने ट्विटमध्ये राज्यातील मोठ्या नेत्यांबद्दल अवमानकारक भाषा वापरल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचे कायदेशीर सल्लागार धरम मिश्रा यांनी समीर ठक्करविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र आता समीत ठक्कर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्विटरवर राष्ट्रवादीच्या एका ट्विटचा फोटो शेअर करुन सवाल उपस्थित केला आहे.

निलेश राणे यांनी राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील एका ट्विटचा फोटो शेअर केला आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी ७ जून २०१९ला दुष्काळी दौरा केल्यानंतर राष्ट्रवादीने एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं कार्टून काढण्यात आलं होतं. याच ट्विटचा उल्लेख करत निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

 

News English Summary: Nilesh Rane shared a photo of a tweet on the NCP’s official Twitter account. After Uddhav Thackeray and Aditya Thackeray’s drought tour on June 7, 2019, the NCP had sent a tweet. In this tweet, cartoons of Uddhav Thackeray and Aditya Thackeray were drawn.

News English Title: BJP leader Nilesh Rane has criticized Shiv Sena over Baby Penguin politics News Latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या