2 May 2025 9:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

सुशांतचे कुटुंबीय संजय राऊत यांच्या विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याच्या तयारीत

Bollywood actor Sushant Singh Rajput, Neeraj Singh, Defamation case, MP Sanjay Raut

मुंबई, १० ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी राजकीय वाद उफाळला आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या बेछुट आरोपानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणात उडी घेत सुशांतच्या वडिलांबद्दल गंभीर आरोप केला होता. पण, सुशांतच्या मामाने राऊतांचा दावा खोडून काढला आहे.

संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरामध्ये सुशांतच्या वडिलांवर गंभीर आरोप केला होता. त्यांच्या या आरोपावर सुशांतचे मामा आर.सी.सिंग यांनी खुलासा केला आहे. ‘खासदार संजय राऊत यांनी आमच्या कुटुंबीयावर चुकीचे आरोप केले आहे. त्यांचे हे वक्तव्य प्रतिमा मलिन करणार आहे. कोणतीही माहिती न घेता उगाच आरोप करून एखाद्याच्या प्रतिमेवर बोट ठेवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?’ असा सवाल सिंग यांनी थेट राऊतांना विचारला.

दरम्यान आता या प्रकरणावरुन संजय राऊत यांच्याविरोधात सुशांतच्या कुटुंबीयांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं सांगितलं आहे. सुशांतचा चुलत भाऊ आणि भाजपा आमदार नीरज कुमार सिंग बबलु यांनी संजय राऊतांनी केलेले सगळे आरोप धुडकावून लावलेत. शिवाय या आरोपांवर तीव्र संताप व्यक्त केला. संजय राऊत यांनी आमच्या कुटुंबावर केलेला लज्जास्पद आरोप निंदनीय आहे. याविरोधात आम्ही मानहानी दावा करू असं त्यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Bollywood actor Sushant Singh Rajput’s relative Neeraj Singh will now file a defamation case against MP Sanjay Raut for accusing Sushant Singh Father father getting married the second time which made Sushant Singh Rajput upset.

News English Title: Bollywood actor Sushant Singh Rajput relative Neeraj Singh will now file a defamation case against MP Sanjay Raut News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या