15 May 2021 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे ताैक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने | अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
x

सर्व घरांच्या आत काय होतं त्याची माहिती सार्वजनिक घरगडी सेनेचा अध्यक्षांकडे दिसते

Former MP Nilesh Rane, MP Sanjay Raut, Sushant Singh Rajput family

मुंबई, १० ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी राजकीय वाद उफाळला आहे. भाजप नेत्यांनी केलेल्या बेछुट आरोपानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणात उडी घेत सुशांतच्या वडिलांबद्दल गंभीर आरोप केला होता. पण, सुशांतच्या मामाने राऊतांचा दावा खोडून काढला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरामध्ये सुशांतच्या वडिलांवर गंभीर आरोप केला होता. त्यांच्या या आरोपावर सुशांतचे मामा आर.सी.सिंग यांनी खुलासा केला आहे. ‘खासदार संजय राऊत यांनी आमच्या कुटुंबीयावर चुकीचे आरोप केले आहे. त्यांचे हे वक्तव्य प्रतिमा मलिन करणार आहे. कोणतीही माहिती न घेता उगाच आरोप करून एखाद्याच्या प्रतिमेवर बोट ठेवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?’ असा सवाल सिंग यांनी थेट राऊतांना विचारला.

दरम्यान आता या प्रकरणावरुन संजय राऊत यांच्याविरोधात सुशांतच्या कुटुंबीयांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं सांगितलं आहे. सुशांतचा चुलत भाऊ आणि भाजपा आमदार नीरज कुमार सिंग बबलु यांनी संजय राऊतांनी केलेले सगळे आरोप धुडकावून लावलेत. शिवाय या आरोपांवर तीव्र संताप व्यक्त केला. संजय राऊत यांनी आमच्या कुटुंबावर केलेला लज्जास्पद आरोप निंदनीय आहे. याविरोधात आम्ही मानहानी दावा करू असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, याच प्रकरणावरून भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. त्यांनी याच विषयाला अनुसरून ट्विट करत म्हटलं आहे की, “संज्या मग त्या कलानगरच्या एका सम्राठाचे आणि सूने चे किस्से पण सांगून टाक… ते पण लोकांना कळू दे. सार्वजनिक घरगडी सेनेचा अध्यक्ष संज्याला करून टाका कारण ह्याला सगळ्या घरांच्या आत काय होतं ह्याची माहिती दिसते.”

 

News English Summary: Actor Sushant Singh Rajput case has sparked political controversy. Shivsena MP Sanjay Raut had also jumped into the fray after BJP leaders made baseless allegations against Sushant’s father.

News English Title: Former MP Nilesh Rane slam Shivsena MP Sanjay Raut over allegations on Sushant Singh Rajput family News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x