रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर नवनीत राणा यांची कोरोना चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह

मुंबई, १८ ऑगस्ट : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. नवनीत राणा यांच्या तब्येतीत शनिवारी सुधारणा झाली. त्यांना अतिदक्षता विभागामधून बाहेर हलवले होते. त्यानंतर प्रकृती सुधारल्याने रवी राणा यांना शनिवारी आणि नवनीत राणा यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र आता मुंबई महापालिकेनं नवनीत राणा यांच्यासह रवी राणा यांची कोरोनाची चाचणी केली असता दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने दोघांनाही होम क्वारंटाईन राहण्यास सांगतिले आहे. त्यानंतर त्यांनी मुंबईत होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे.
खासदार नवनीत राणा यांना 6 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 12 सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले होते. सुरुवातील नवनीत राणा यांच्यावर अमरावतीत उपचार करण्यात आले होते. पण श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना तातडीने नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पण, नागपूरमध्येही उपचारादरम्यान नवनीत राणा यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे 13 ऑगस्ट रोजी नवनीत राणा यांना तातडीने मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. लीलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. अखेर, उपचाराअंती त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. पण, आता परत कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
खासदार नवनीत कौर राणा यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पुढील 20 दिवस त्या क्वारंटाईन राहणार आहेत. @NavneetKRana यांना रविवारी (16 ऑगस्ट) रात्री डिस्चार्ज मिळाला.
त्यांचे पती आमदार रवी राणा यांना शनिवारी (15 ऑगस्ट) रात्री लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.— Office Of Navneet Kaur Rana (@NavneetRanaOff) August 17, 2020
News English Summary: Amravati MP Navneet Rana and her husband MLA Ravi Rana were discharged from Lilavati Hospital in Mumbai. But now when the Mumbai Municipal Corporation has tested the corona of Navneet Rana and Ravi Rana, shocking information has come to light that the reports of both of them came back positive.
News English Title: Corona reports from MP Navneet Rana and Ravi Rana have come back positive News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL