दिशावर बलात्कार झाल्याचा आरोप चुकीचा | आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास - दिशाची आई
नवी दिल्ली, ८ ऑगस्ट: दिशावर बलात्कार करुन तिची हत्या केली आहे असा आरोप केला जात आहे. हे सर्व चुकीचं आहे. आम्ही दोनदा पोलिसांना जबाब दिला आहे. मालवणी पोलिसांकडे याचा रेकॉर्ड आहे. आम्ही पोस्टमोर्टम रिपोर्ट पाहिला आहे. मुंबई पोलीस योग्यरितीने काम करत आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे. आम्ही शांत आहोत पण मीडिया आमच्या मुलीची बदनामी करत आहे. आम्ही आता सहन करु शकत नाही. लोकांनी सत्य स्वीकारावं अशी विनंती दिशाच्या आई-वडिलांनी केली आहे.
दिशाची आई म्हणाली की, सर्वात आधी मी देशातील लोकांशी, मीडियाशी, सोशल मीडियातील लोकांना सांगते हे सर्व चुकीचं आहे. सर्व बातम्या खोट्या आणि अफवा आहेत. मी माझ्या मुलीला गमावलं आहे पण आता अशाप्रकारच्या चर्चा आम्हालाही मारुन टाकतील. सुप्रीम कोर्टाने या सर्व चर्चांना थांबवले पाहिजे. आम्ही खूप पीडित आहोत. आता आमच्या मुलीबद्दल खोटं ऐकण्याची ताकद आमच्यात नाही अशी विनवणी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणात दिशा सालियानच्या आई-वडिलांनी काहीही विधान केले नव्हते मात्र आता त्यांनी आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत या संपूर्ण प्रकारावर भाष्य केले आहे. माझ्या मुलीला बदनाम करुन फायदा उचलू नका, तिच्या मृत्यूशी खेळू नका, ती आमची एकुलती एक मुलगी होती. आम्ही आमच्या मुलीला गमावलं आहे. आता जे लोक तिची प्रतिमा मलिन करत आहेत ते आमची छळवणूक करुन संपवून टाकत आहेत असं त्यांनी सांगितले आहे.
तत्पूर्वी, असा रिपोर्ट आहे की, दिशाने इमारतीच्या १४व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पण त्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे तिच्या एका जवळच्या मैत्रिणीने सांगितलं आहे. इंडिया टुडेने दिलेल्या एका वृत्तानुसार, दिशा सालियनच्या एका मैत्रिणीने घटनेच्या दिवसाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. घटनेच्या दिवशी दिशाच्या घरी तिचा होणारा पती रोहन, हिमांशु आणि कॉलेजमधील मित्र नील व दीप हे होते. सगळेच पार्टी करत होते आणि ड्रिंकही करत होते. पण ड्रिंक केल्यानंतर दिशा फार इमोशनल झाली होती. ती पुन्हा पुन्हा बोलत होती की, कुणालाही तिची काळजी नाही. यावरून शंका निर्माण होऊ शकते. पण दिशाच्या मैत्रिणीने सांगितले की, ड्रिंक घेतल्यावर ती नेहमीच अशा प्रकारे बोलत होती.
दिशाच्या मैत्रिणीनुसार, घरात पार्टी सुरू होती. पण दिशा रात्री ८ वाजता एका दुसऱ्या मित्रासोबत लॉकडाऊननंतर काय करायचं यावर चर्चा करत होती. त्यानंतर दिशाने यूकेतील मित्राला फोन केला. फोनवर ती रडू लागली होती. त्यामुळे हिमांशु थोडा नाराज झाला. त्याने तिला रडण्यास मनाई केली कारण पार्टीचा मूड खराब होत होता.
त्यानंतर दिशा तिच्या रूममध्ये गेली आणि तिने दरवाजा आतून बंद करून घेतला. बराचवेळ दिशाने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे दरवाजा तोडला. रूममध्ये दिशा नव्हती. पण जेव्हा हिमांशु आणि दीपने खाली पाहिलं तर ते हैराण झाले. सगळेच खाली धावत गेले. पण तोपर्यत उशीर झाला होता.
News English Summary: Teary eyes Vasanti revealed that Disha did not use to discuss her works with the family. However, one thing she is sure that she has no connection with Sushant Singh Rajput. As per Vasanti, Disha went to Sushant’s house with some clothes along with her boss, it was then when she met Sushant Singh Rajput.
News English Title: Disha Salain mother Vasanti Salain says no connection between SSR News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News