5 June 2023 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Anmol India Share Price | मालामाल शेअर! अनमोल इंडिया शेअरने 843% परतावा दिला, आता एका शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स मिळणार My EPF Money | पगारदारांनो! EPF कट होतं असेल तर लक्ष द्या, हे लोकच काढू शकतात पैसे, या कागदपत्रांची असेल गरज Loksabha Election 2024 | 2024 लोकसभेसाठी 9 वर्षात गमावलेल्या मित्रपक्षांपुढे भाजप हात पसणार, भाजप गुजरात लॉबीवर कोण विश्वास ठेवणार? Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी झाले, तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या Sulochana Didi | निरागस अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींचे वृद्धापकाळाने निधन, त्या ९४ वर्षांच्या होत्या Cash Transactions | तुम्हीही खूप कॅश ट्रान्झॅक्शन्स करत असाल तर नियम जाणून घ्या आणि इन्कम टॅक्स नोटीस टाळा ATM Cash Withdrawal Limit | तुम्ही बँक ATM वापरता? प्रतिदिन पैसे काढण्याची मर्यादा बदलली, नवा नियम आणि रक्कम लक्षात ठेवा
x

Fake Twit Alert | शर्मिला ठाकरेंच्या नावाने कंगनाचं समर्थन | तर सेनेविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया

Fake Alert, Sharmila Raj Thackeray, Kangana Ranaut, Marathi News ABP Maza

मुंबई, ५ सप्टेंबर : कंगना रणौत आणि शिवसेना वाद जबरदस्त पेटला आहे. असे असतानाच, आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले हरियाणाचे गृह आणि आरोग्यमंत्री तथा भाजपाचे आक्रमक नेते अनिल विज यांनी या वादात उडी घेतली आहे. त्यांनी शिवसेनेला इशारा देत, शिवसेनेचे नेते सत्य बोलण्यापासून कुणालाही रोखू शकत नाही, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.

कंगनाचे समर्थन करताना विज यांनी शनिवारी शिवसेनेवर जबरदस्त हल्ला चढवला. ते म्हणाले, “मुंबई काय शिवसेनेचा खानदानी भू-भाग आहे का? का त्यांच्या बापाचा प्रदेश आहे? मुंबई भारताचा भाग आहे. तेथे कुणीही जाऊ शकतो. जे अशा प्रकारच्या धमक्या देतात त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. आपण कुणालाही सत्य बोलण्यापासून रोखू शकत नाही.”

एकाबाजूला भाजप आणि देशभरातून वातावरण तापलेले असताना दुसऱ्या बाजूला समाज माध्यमांचा दुरुपयोग देखील सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. शर्मिला राज ठाकरे राज्याच्या राजकारणातील एक सुज्ञ महिला म्हणून सर्वश्रुत आहेत, किंबहुना राज ठाकरेंच्या कुटुंबातील सर्वच महिला समाज माध्यमांपासून दूर राहणंच पसंत करतात. मात्र त्यांच्याच नावाने ट्विटरवर फेक अकाउंट असून त्यावर कंगना रानौतच्या समर्थनार्थ आणि शिवसेनेच्या विरोधात विखारी प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. विशेष म्हणजे त्यावर देशभरातून नेटिझन्स शिवसेनेच्या नावाने टोकाच्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे मोठे गैरसमज मनसेच्या नकळत पसरवले जाऊ लागले आहेत. स्वतः राज ठाकरे यांनी देखील कंगना रानौत प्रकरणी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती देखील मुंबई पोलिसांबाबत कंगनाने केलेल्या वक्तव्यावरून होती.

तत्पूर्वी २०१४ च्या नोव्हेंबर महिन्यात अशाच प्रकारे राज ठाकरेंच्या कन्या उर्वशी ठाकरे यांच्या नावे समाज माध्यमांवर फेक अकाउंट उघडून त्यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत विखारी पोस्ट टाकून वातावरण तापविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला होता आणि त्यानंतर मनसेला पोलीस तक्रार दाखल करून याबाबत खुलासा करावा लागला होता. त्यामुळे जर शर्मिला ठाकरे यांचे हे फेक अकाउंट असेल तर त्यावर पक्षाने वेळीच हालचाल करणं गरजेचं आहे. कारण या अकाउंटला मनसेचे पदाधिकारी देखील फॉलो करत आहेत.

 

News English Summary: Sharmila Raj Thackeray is well known as a wise woman in state politics, in fact all the women in Raj Thackeray’s family prefer to stay away from social media. However, there is a fake account on Twitter in his name and it is raining disgusting reactions in support of Kangana Ranaut and against Shiv Sena.

News English Title: Fake Alert on Sharmila Raj Thackeray twitter account reaction on Kangana Ranaut Marathi News LIVE latest Updates.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x