24 October 2019 8:30 AM
अँप डाउनलोड

पूर्वपदावर आलेली मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा कोलमडली

Central Railway, Western Railway

मुंबई : खडवलीजवळ रेल्वे रूळाला तडा गेल्याने ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप आणि डाउन दोन्ही दिशेच्या गाड्या ३५ ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे मुंबईला निघालेल्या चाकरमान्यांना आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, आज सकाळी ही बाब निदर्शनास आली.

त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याची माहिती आहे. हे काम पूर्ण झाले आहे, मात्र वाहतूक अद्याप पूर्वपदावर आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. तसेच काल डोंबिवली येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर आज पुन्हा सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

हॅशटॅग्स

#Mumbai(51)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या