15 December 2024 4:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
x

माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन कृष्णकुंज'वर

Raj Thackeray, BJP Prakash Mahajan, Former MLA Harshavardhan Jadhav

मुंबई:  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं अधिवेशन येत्या २३ तारखेला मुंबईत होणार असून त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नव्या रूपात दिसणार असल्याचं वृत्त आहे. यावेळी तब्बल एक लाख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाचा नवा झेंडा जाहीर करणार आहेत असं म्हटलं जातं. मात्र या मेळाव्याचं नवं पोस्टर प्रकाशित करण्यात आलंय. पोस्टरवर भगव्या रंगात महाराष्ट्राचा नकाशा दाखविण्यात आलाय. आधिचा पंचरंगी झेंडा पोस्टरवरुन गायब झालाय. राज ठाकरेंची महाराष्ट्रधर्माची भूमिका असणार असल्याचं स्पष्ट झालंय. सततच्या अपयशाला दूर सारण्यासाठी राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ निर्माण करतील अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

दरम्यान, कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज सकाळी कृष्णकुंजवर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. हर्षवर्धन जाधव अचानक राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. येत्या २३ जानेवारीला मुंबईत होणाऱ्या मनसेच्या महाअधिवेशनात हर्षवर्धन जाधव पुन्हा मनसेत प्रवेश करणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यापाठोपाठ भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजनही ‘कृष्णकुंज’वर दाखल झाले आहेत. प्रथमच मनसेचे महाअधिवेशन होत असून, यामध्ये पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसंबंधी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

हर्षवर्धन जाधव यांचा राजकीय आलेख उतरत्या दिशेने असून त्यांना लोकसभेनंतर विधानसभेतही पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या राजकीय जीवनासोबतच व्यक्तिगत जीवनही नेहमीच वादळी ठरलं आहे. अपक्ष, मनसे, शिवसेना, पुन्हा अपक्ष असा प्रचंड विस्कळीत राजकीय प्रवास करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांनी आजपर्यंत अनेकांवर गंभीर आरोप केले.

तत्पूर्वी, काल सकाळीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं एक पोस्टर समोर आलं होतं. या पोस्टरमध्ये राज ठाकरे यांचा उल्लेख महाराष्ट्र धर्म सम्राट असा करण्यात आला आहे. महाराष्ट्रावर जेव्हा कधी संकट आलं आहे मग ते गोविंदा, गणेशोत्सव यावरचं असो किंवा रझा अकादमीच्या गुंडांनी घातलेला दंगा असो. राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रासाठी उभी राहिली आहे असं या पोस्टरबद्दल संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. त्या पोस्टरनंतर आता नवं पोस्टर समोर आलं आहे. विशेष बाब म्हणजे या दोन्ही पोस्टरच्या मागे भगवा रंग वापरण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येणार का? या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं अधिवेशनात अधिकृत लाँचिंग होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच त्यांच्यावर पक्षातील मोठी जबाबदारीही दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २३ जानेवारी ही तारीख निवडली आहे. त्यासोबतच पक्षाच्या झेंड्यातही बदल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदुत्वाचे राजकारण करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

 

Web Title:  Former MNS MLA Harshavardhan Jadhav and Prakash Mahajan Meet Raj Thackeray at Krushnakunj.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x