3 May 2025 10:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का | किरीट सोमय्यांचा सवाल

Former MP Kirit Somaiya, Shivsena, Hindutva

मुंबई, ४ जानेवारी: औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर बोचऱ्या शब्दांत वार केला आहे. शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का, असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केला. (Former MP Kirit Somaiya criticised Shivsena over Hindutva issue)

ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काँग्रेस पक्षानंतर समाजवादी पक्षानेही संभाजीनगर या नावाला विरोध केला आहे. तेव्हा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना हिंदूहृदयसम्राटांना मानते की नाही, हे पाहायची वेळ आली आहे. शिवसेनेने त्यांचा भगवा हिरवा झाला आहे का, याचे उत्तर द्यावे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

किरीट सोमय्या व्हिडिओद्वारे म्हणाले की, काँग्रेस पक्षानंतर समाजवादी पक्षानेही संभाजीनगर या नावाला विरोध केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि शिवसेना हिंदूहृदयसम्राटांना मानते की नाही, हे पाहायची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचा भगवा आता हिरवा झाला आहे का, असा सवालही किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

भारतीय जनता पक्षाला शिवसेनेच्या हिंदुत्वाबद्दल कितीही शंका असली तरी भाजपचे नेते निवडणुका आणि मतदारसंघातील मुस्लिमांचं प्राबल्य विचारात घेऊन मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत असतात ते इतरांना माहित नसल्याच्या भ्रमात भाजप नेते असल्याचं दिसतं आहे.

 

News English Summary: Kirit Somaiya said in the video that after the Congress party, the Samajwadi Party has also opposed the name Sambhajinagar. Therefore, it is time to see whether Uddhav Thackeray and Shiv Sena believe in Hindu heart emperors or not. Similarly, Kirit Somaiya has also raised the question whether Shiv Sena’s saffron has turned green now.

News English Title: Former MP Kirit Somaiya criticised Shivsena over Hindutva issue news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#KiritSomaiya(31)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या