2 May 2025 4:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

मुंबई पोलिसांनी कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालाच्या अखेर मुसक्या आवळल्या!

Mumbai Police, Crime Branch, Gangster Ejaz Lakdawala, Police Commissioner Barve

मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी एजाज लकडावाला याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी पाटणा विमानतळावरुन त्याला अटक केली आहे. अटक केल्यानंतर त्याला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. एजाज लकडावाला मुंबई पोलिसांच्या वॉण्टेड यादीत होती. २००३ मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या एका हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला अशी अफवा पसरली होती.

लकडावाला याची मुलगी सानिया हिला मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ३० डिसेंबर रोजी बनावट पासपोर्टप्रकरणी अटक केली होती. ती मुंबईहून नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. सानियाच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून एजाज याच्या मुसक्या आवळल्या. त्याची २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस सहआयुक्त संतोष रस्तोगी यांनी दिली.

भारतात मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक असलेला एजाज लकडावाला अंडवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा माजी हस्तक होता. त्याच्याविरोधात खंडणी, हत्या आणि असेच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दाऊदच्या टोळीतून बाहेर पडल्यानंतर दाऊदचे म्होरकेही त्याच्या मागावर होते.

२००३ मध्ये दाऊदच्या सहकाऱ्यांनी एका बॉम्बस्फोटात त्याला ठार मारण्याचा कट रचला होता. मात्र, तो या हल्ल्यातून बचावला होता. नंतर तो कॅनडामधून आपले खंडणीचे उद्योग करत होता. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एजाजविरुद्ध २७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी २५ एकट्या मुंबईतील आहेत. या प्रकरणीच लकडावालाची सध्या कसून चौकशी केली जात आहे.

 

Web Title:  Gangster Ejaz Lakdawala arrested by anti extortion cell of Mumbai Police Crime Branch.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या