30 April 2025 10:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

अटकेच्या शक्यतेने परमबीर सिंह २ महिन्यांच्या सुट्टीवर? | ५ मे पासून पदभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे

Parambir Singh

मुंबई, २८ जून | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांचा आरोप करून खळबळ माजवणारे माजी मुंबई पोलीस आयुक्त व राज्य गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग हे तब्बल 2 महिन्यांच्या सुट्टीवर गेले असल्याची माहिती समोर येत आहे. सध्याच्या घडीला परमबीर सिंह हे चंदिगड येथे असल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे. तेथील एका स्थानिक रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रातून मिळालेल्या माहितीनुसार परमबीर यांची तब्येत ठीक नसल्याचे समजते. त्यामुळे परमबीर हे 5 मे पासून सुट्टीवर गेले असल्याचे समोर येत आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ॲन्टिलिआ इमारतीच्या बाहेर काही अंतरावर स्कॉर्पियो गाडीतील सापडलेल्या जिलेटीन स्फोटकांच्या संदर्भात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचचा बडतर्फ अधिकारी सचिन वाझे यास अटक करण्यात आलेली होती. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात निष्काळजीपणा बाळगला गेल्याचं म्हणत तडकाफडकी माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केली होती.

या घडामोडीनंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्यावर मुंबईतील 1700 हून अधिक बार मालकांकडून 100 कोटी रुपये दर महिना वसूल करण्यास भाग पाडले होते, असा आरोप केला होता. यानंतर काही दिवसातच कोर्टाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांच्या विरोधात चौकशी सुरू झाली. त्यामुळे गृहमंत्री पदावरून अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

कार्यालयाचा पदभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे:
या दरम्यान परमबीर सिंग या आयपीएस अधिकाऱ्याच्या विरोधात मुंबई पोलीस खात्यातील काही पोलीस निरीक्षकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. यावरून परबीरसिंग यांच्या विरोधातही लाचलुचपत विभागाकडून चौकशी केली जाणार असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, राज्याच्या गृहरक्षक दलाचा पदभार स्वीकारल्यानंतर 5 मे पासूनच परमबीर सिंग हे त्यांच्या कार्यालयात येत नसल्याचं समोर आले आहे. सध्याच्या घडीला त्यांच्या कार्यालयाचा अतिरिक्त भार हा सिव्हिल डिफेन्सचे प्रमुख आयपीएस के व्यंकटेशन यांच्याकडे देण्यात आलेला असल्याचे समोर आले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: IPS Parambir Singh on leave for two months since 5th may news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या