3 May 2025 4:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

विधानसभा: बॉर्डर, कारगिल हे चित्रपट असताना भाजपचा 'उरी' फुकट शोचा घाट कशासाठी? सविस्तर

URI The Surgical Strike, Kargil Movie, Border Movie, Maharashtra State Assembly Election 2019

पुणे: राज्यातील तरुणांना ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट मोफत पाहायला मिळणार आहे. याबाबत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृत सुचना केल्या आहेत. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित हा चित्रपट कारगिल विजयदिनी म्हणजेच २६ जुलैला सकाळी १० वाजता दाखवण्यात येईल.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील चित्रपटगृहांना २६ जुलै रोजी सकाळी १० वाजताचा एक शो मोफत दाखवण्यास सांगितले आहे. १८ ते २५ वयोगटातील तरुण याचा लाभ घेऊ शकणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी चित्रपटगृहाचे चालक आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्यासोबत नियोजनासाठी बैठक घ्यावी, अशाही सुचना देण्यात आल्या आहेत. उरी चित्रपट मोफत दाखवण्यामागे तरुणांमध्ये भारतीय सैन्याबद्दल अभिमान आणि आदर वाढावा म्हणून हा निर्णय घेतल्याचे निलंगेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटात प्रमुख भुमिकेत अभिनेता विकी कौशल आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयाने ‘हाउज द जोश’ ही घोषणाही प्रसिद्ध केली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहापासून संसदेपर्यंत ही घोषणा गाजली. या चित्रपटानेच विकी कौशलची लोकप्रियता प्रचंड वाढली. दहशतवाद्यांकडून भारतावर होणारे हल्ले आणि त्यावर भारतीय सैन्याने घेतलेली आक्रमक भूमिका याला केंद्रभागी ठेऊन हा चित्रपट तयार करण्यात आला होता. याला देशभरातून प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिली होता.

दरम्यान राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणूक होणार असल्यानेच सरकारने हा घाट घातल्याचे राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे. आदेशाप्रमाणे १८ ते २५ वयोगटातील तरुण मतदार सत्ताधाऱ्यांच्या रडारवर असल्याने ते स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे बॉर्डर आणि कारगिल सारखे सिनेमा असताना सुद्धा सरकारने उरी सिनेमाच्या फुकट शोचा घाट घातल्याने ते स्पष्ट होतं आहे असं अनेकांनी म्हटलं आहे. बॉर्डर सिनेमा १३ जुन १९९७ रोजी तर ‘एलओसी कारगिल’ हा सिनेमा १२ डिसेंबर २००३ रोजी रिलीज झाले होते. त्यामुळे हे सिनेमे आले तेव्हा सरकारने सध्या वयाची अट घेतलेली तरुण मुलं कोवळी होती. दरम्यान भाजपने ज्या बोफोर्स घोटाळ्यावरून राजकारण केलं त्या ‘बोफोर्स’ तोफांनी कारगिल युद्धात काय महत्वाची जवाबदारी पेलली ते देखील या तरुणांना समजेल, जर ‘एलओसी कारगिल’ सिनेमा दाखवला जाईल.

दरम्यान उरी सिनेमा मार्फत लोकसभा निवडणुकीत ब्रेनवॉश झालेले तरुण अजून तरी त्याच अवस्थेत आहेत आणि त्याचाच फायदा राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सत्ताधारी घेताना दिसत आहेत. कारण याच सरकारमध्ये अचानक नावारूपाला आलेले जेम्सबॉन्ड अजित डोभाल ज्यांना लोकसभेनंतर थेट मंत्रिपदाचा दर्जा प्राप्त झाला आहे आणि भाजपच्या अनेक नेत्यांशी संबंधित कॅरेक्टर त्यात असल्यानेच भाजपने ही फुकट शोची योजना आखल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.

 

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या