24 March 2025 9:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension Money | खाजगी कर्मचाऱ्यांना अपडेट, 25000 पगार असणाऱ्यांना EPF चे 59,41,115 रुपये आणि रु.6000 पेन्शन मिळणार Sandeep Deshpande | मनसेच्या मुंबई शहराध्यक्षपदी नेमणूक झालेले संदीप देशपांडे पक्षाला उभारणी देणार का? त्यांच्या कार्याचा आढावा Raj Thackeray | विधानसभेत लोकप्रतिनिधी कमी आणि 'खोके भाई'च जास्त दिसतात, स्वतःच्या फायद्यासाठी काम करतात Sushant Singh Rajput | CBI क्लोजर रिपोर्टमध्ये बोगस नेत्यांचंही भांडं फुटलं, ना विष प्रयोग, ना गळा दाबला, ती आत्महत्याच होती Rattan Power Share Price | तुफानी तेजीमुळे 10 रुपयाच्या शेअर फोकसमध्ये, पुन्हा मल्टिबॅगर परतावा मिळेल? - NSE: RTNPOWER SBI Special FD Scheme | सर्वाधिक परतावा देणाऱ्या SBI स्पेशल FD योजना अनेकांना माहित नाहीत, इथे पैसे गुंतवा Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 24 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

भाजपाला पहिला धक्का; अजित पवारांचा राजीनामा

Ajit Pawar, Sharad Pawar, NCP

मुंबई: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. काही वेळापूर्वीच ही बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासूनच सुरु होते. आज अखेर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते हे अजित पवारांच्या भेटीला गेले होते. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु होते.

तत्पूर्वी, पवार कुटुंबियांशी बैठकीत त्यांचं मन वळविण्यात यश आल्यानंतर अजित पवार वर्षा बंगल्यावर गेले आणि मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला असं वृत्त आहे. दरम्यान, दिल्लीत देखील काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेन्द्र मोदी, अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यात बैठक पार पडली असून, मुख्यमंत्र्यांना देखील राजीनाम्याचे आदेश देण्यात आल्याचं वृत्त असून त्यासाठीच ३:३० वाजता मुख्यमंत्र्यांनी भेट बोलावली आहे समजतं.

महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज, मंगळवारी सकाळी महत्वपूर्ण निकाल दिला. महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी घ्यावी, असा आदेश कोर्टानं दिला. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, त्याचं लाइव्ह प्रक्षेपण करा, असे दिशानिर्देशही कोर्टाने दिले आहेत.

सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे त्या निकालाचा (Chandrakant Patil on Maharashtra Floor Test ) आम्ही आदर करतो. उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही तयार आहोत, आम्ही बहुमत सिद्ध करुन दाखवू, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजप नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधून बहुमत सिद्ध करणारच असा विश्वास व्यक्त केला. (Chandrakant Patil on Maharashtra Floor Test). मात्र धक्कादायकरित्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथविधी घेतला त्या दिवशी राजभवनातून बाहेर चेहऱ्यावर मोठं हास्य आणि हात वर करत मोठी आवळत येणारे गिरीश महाजन यांचे आजच्या प्रतिक्रियेवेळी पडलेले चेहरे बरंच काही सांगून जातं होते. अगदी एका ओळीत प्रतिक्रिया देऊन हे नेते निघून गेल्याने उद्या काय होणार याचा प्रत्यय चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन या भाजप नेत्यांचे चेहरे पाहून अनेकांना आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात बंड करून भाजपला जाऊन मिळालेले व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे द्विधा मनस्थितीत आहेत. राष्ट्रवादीतील नेत्यांकडून होत असलेल्या सततच्या मनधरणीमुळं ते पुन्हा वेगळा विचार करत असल्याचं बोललं जातं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अजितदादांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं त्यांच्या ‘घरवापसी’च्या चर्चेला जोर आला आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची वर्षा निवासवर बैठक बोलविण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बैठकीला स्वतः अजित पवार देखील सामील झाले आहेत असं वृत्त होतं आणि त्याप्रमाणे ते वर्षा निवासवर हजर झाले, मात्र ते या तातडीच्या बैठकीला जास्त वेळ न थांबता लगेचच बाहेर पडले आणि बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे त्यांना पुन्हा परतीच्या मार्गावर आणण्यासाठी स्वतः शरद पवारांनी पुढाकार घेतला असून राजकरण वेगळं ठेवून कुटुंब एकत्र ठेवण्यावर भर देण्यात आल्याने, त्याला संपूर्ण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी साथ दिली आहे.

तत्पूर्वी, महाराष्ट्रातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेल्या निर्णयाचं काँग्रेसनं स्वागत केलं आहे. ‘न्यायालयाच्या या निर्णयामुळं देशाच्या राज्यघटनेचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांनी आता बहुमत चाचणीला सामोरं जाण्याआधीच राजीनामा द्यावा,’ अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

बहुमत चाचणीच्या मतदानाचं थेट प्रक्षेपण व्हावं, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. काँग्रेसनं या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे. संविधान दिनी आलेला हा निर्णय देशाच्या राज्यघटनेचं महत्त्व अधोरेखित करणारा आहे. हा निर्णय म्हणजे राज्यघटनेचा सन्मान आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या