26 April 2024 4:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार
x

जिल्हापरिषदेतील अनुभवानंतर आमदार रोहित पवार यांचा विधानसभेत प्रवेश

MLA Rohit Pawar, NCP

मुंबई: महाराष्ट्रात गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. राज्यातील सत्ता स्थापनेचा अखेर मंगळवारी तिढा सुटला. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देते, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आता आपले बहुमत दाखवत ‘महाविकास’आघाडी सत्ता स्थापन करणार आहेत.

‘महाविकास’आघाडी झालेल्या निर्णयानुसार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, आज सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे त्यांना आमदारकीची शपथ देणार आहेत.

महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यानं नवं सरकार स्थापन झालं. परंतु तीनच दिवसांमध्ये हे सरकार कोसळलं. प्रथम अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील हे आता निश्चित झालं आहे. दरम्यान काही वेळेपूर्वीच सुरु झालेल्या शपथविधी सोहळ्याला आमदार अजित पवार यांचं देखील आगमन झालं असून त्यावेळी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचं स्वागत केलं.

दरम्यान, पवार कुटुंबीयांची पुढची पिढी सध्या राज्याच्या राजकारणात उतरली असली तरी रोहित पवार यांनी जिल्हा परिषदेवर सदस्य राहिले असून, त्यांना जिल्हापातळीवरील प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. मात्र आता रोहित पवार हे आमदार होऊन थेट विधानसभेत मतदारसंघाचे विषय मांडताना जनतेला दिसतील.

हॅशटॅग्स

#RohitPawar(75)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x