2 July 2020 10:39 AM
अँप डाउनलोड

प्रकृती बिघडल्याने महापौर किशोरी पेडणेकर बॉम्बे रुग्णालयात दाखल

Mumbai Mayor, Kishori Pednekar, Bombay hospital

मुंबई, २९ जून : कोरोना विषाणूने संपूर्ण मुंबईला कवेत घेतले आहे. कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. शहरातील उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. विशेष म्हणजे पालिकेच्या ‘डी’ वॉर्डमध्ये नियंत्रणात असलेला कोरोना गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. यात चार दिवसांपूर्वी दररोज 30 ते 35 ने होणारी रुग्णवाढ आता मात्र सरासरी 50 झाली आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

विशेष म्हणजे ही वाढ मलबार हिल, नेपियन्सी रोड, पेडर रोड, ब्रीचकँडी अशा उच्चभ्रू वस्त्यांमध्ये होत आहे. त्यामुळे पालिकेसमोर ‘डी’ वॉर्ड म्हणजेच ग्रँट रोड परिसरात कोरोना रोखण्याचे आव्हान वाढले आहे.

दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. किडनी स्टोनचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मागील २-३ दिवसांपासून तब्येत ठिक नसल्याने त्या घराबाहेर पडल्या नव्हत्या. आज त्रास वाढल्याने त्यांना बॉम्बे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

 

News English Summary: Mumbai Mayor Kishori Pednekar has been admitted to Bombay Hospital. He was admitted to the hospital with kidney stones.

News English Title: Mumbai Mayor Kishori Pednekar admitted to Bombay hospital News Latest Updates.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#MumbaiMayor(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x