3 May 2025 4:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

पोलीस असं धाडस करणारच नाहीत | पोलिसांना आदेश देणाऱ्यांचा शोध होणं गरजेचं - राज ठाकरे

MNS chief Raj Thackeray, press conference, Sachin Vaze case

मुंबई, २१ मार्च: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. माध्यमांनी विषय इतरत्र विचलित न करता या प्रकरणातील मूळ सूत्रधार ज्यांनी ती स्पोटकांची स्कॉर्पिओ मुकेश अंबानींच्या घराबाहेर ठेवायला सांगितली, त्यांच्या मागे केंद्रित राहायला हवं. तसेच या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करत सर्व धागे दोरे शोधून काढणे गरजेचे आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी केली, मात्र सरकारने त्यामागील कारण स्पष्ट केलेलं नाही यावर देखील राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ कुणाच्या सांगण्यावरून स्फोटकं ठेवण्यात आली हे समोर यायचं असेल, तर केंद्र सरकारने याची चौकशी करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला १०० कोटी रुपये मागितले, असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. मूळात ज्यांनी आरोप केले, ते परमबीर सिंग यांना एक वर्ष झालं आहे. लॉकडाउनमुळे त्यांना १२ कोटी देता आली नसेल, पण गृहमंत्र्यांने अशी गोष्ट सांगणं… गृहमंत्री राज्याचे असतात. राज्यात शहरं किती, त्यांना आयुक्तांना गृहमंत्र्यांनी काय सांगितलं हे अजून समोर आलेलं नाही. त्यामुळे देशमुख यांची कसून चौकशी होणं गरजेचं आहे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

 

News English Summary: Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray has raised a number of questions at a public press conference. Without distracting the media, the media should focus on the original facilitator of the case who asked her to keep Spotty’s Scorpio outside Mukesh Ambani’s house.

News English Title: MNS chief Raj Thackeray press conference on Sachin Vaze case news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या