2 May 2025 8:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

मुख्यमंत्र्यांकडून उपहार गृह सुरू करण्याचे संकेत | पण कर्मचाऱ्यांच्या वाहतूक व्यवस्थेचं काय?

MNS Leader Sandeep Deshpande, CM Uddhav Thackeray, Restaurants Open, Unlock 5

मुंबई, २९ सप्टेंबर : भारतात कोरोनाव्हायरस संक्रमितांची संख्या आता 61 लाख 45 हजार 292 झाली आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत निरोगी झालेल्या रुग्णांची संख्या ही नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे. 24 तासांत देशात 70 हजार 589 नवीन रुग्ण आढळून आले. तर, 85 हजार 194 रुग्ण निरोगी झाले. दुसरीकडे कोरोना संक्रमितांमध्ये 60 लाखांचा आकडा पार करणारा भारत हा जगातला दुसरा देश आहे. भारताआधी अमेरिकेनं हा आकडा पार केला होता. तर, 24 तासांत देशात 776 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांची संख्या आता 96 हजार 318 झाली आहे.

कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील उपाहारगृहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होण्याचे संकेत आहेत. उपाहारगृहांबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्यावर शिक्कामोर्तब होताच पुढील आठवडय़ापासून किमान ५० टक्के क्षमतेत उपाहारगृहे सुरू करण्याचा निर्णय घेण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी हॉटेल-उपाहारगृह व्यावसायिकांच्या संघटनांना दिली.

दरम्यान, अनलॉकचा पाचवा टप्पा स सुरू होणार आहे. मुख्यमंत्रांनी संकेत दिले की उपहार गृह सुरू करणार आहेत. तिथे काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था काय? की त्यांनी आकाशात उडत कामावर यायचं?, असं म्हणत मनेसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. त्यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

एकाबाजूला सर्वसामान्यांना अद्यापपर्यंत लोकल प्रवासाची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे उपनगरात आणि मुंबई लगतच्या ठाणे, डोंबिवली, कल्याण, विरार, पालघर या पट्टयातील नोकरदार वर्गाला दररोज मुंबई गाठताना अक्षरक्ष: नाकीनऊ येत आहेत. मुंबई गाठण्यासाठी अनेक तासांचा प्रवास करावा लागतोय. वाहतुकीची मर्यादीत साधने उपलब्ध असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

मात्र हीच बाब ध्यानात घेऊन, राज्य सरकार आता खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याच्या योजनेला अंतिम स्वरुप देत आहे. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे. सध्याच्याघडीला हे कर्मचारी स्वत:च्या खासगी वाहनाने, पूल कार, एसटी किंवा बेस्ट बसने प्रवास करत आहेत. राज्य सरकारने खासगी कार्यालयांमध्ये ३० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे. पण खासागी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा नाहीय. त्यामुळे या कर्मचारी वर्गाला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय.

 

News English Summary: The fifth phase of unlock is about to begin. The Chief Minister indicated that the gift houses would be started. What is the transportation system for the employees working there? MNS general secretary Sandeep Deshpande lashed out at Chief Minister Uddhav Thackeray, saying that he wanted to fly to work. He tweeted criticizing the Chief Minister.

News English Title: MNS Leader Sandeep Deshpande Criticize CM Uddhav Thackeray Restaurants Likely To Open but what about Workers Travelling Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या