आर्यन खान जामीन प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या टिपणीनंतर समीर वानखेडे यांच्या भोवतीचा संशय बळावला

मुंबई, 20 नोव्हेंबर | आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांच्यासह आठ जणांना 2 ऑक्टोबरला ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली होती. एनसबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली होती. त्यानंतर या कारवाईवर अनेक प्रश्नही उपस्थित केले गेले. नवाब मलिक यांनी ही संपूर्ण कारवाई म्हणजे एक प्रकारचा बनाव (Mumbai Cruise Party Aryan Khan case) आहे असं सांगितलं.
Mumbai Cruise Party Aryan Khan case. There is no positive evidence that Aryan Khan, Arbaaz Merchant and Moonmoon Dhamecha conspired to commit drug related offenses, the Mumbai High Court said in an order issued today :
तसंच या प्रकरणातले साक्षीदार प्रभाकर साईल, के. पी. गोसावी, मिलिंद भानुशाली यांच्याकडून समोर आलेल्या गोष्टी या वेगळंच कथन करत होत्या. प्रभाकर साईलने खंडणीसाठी आर्यन खानला अडकवल्याचा आरोप केला. त्यामुळे खळबळ उडाली होती. दरम्यान 27 ऑक्टोबरला आर्यन खानला जामीन मंजूर कऱण्यात आला. तसंच मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांनाही जामीन मंजूर करण्यात आला.
कोर्टाने आज जो आदेश जारी केला आहे त्यामध्ये जामीन का मंजूर करण्यात आला ते आला ते स्पष्ट केलं आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यात अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हे करण्याचा कट रचल्याचा कोणताही सकारात्मक पुरावा नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने आज जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. षडयंत्र किंवा कट रचल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. व्हॉट्स अॅप चॅटमध्ये काहीही आक्षेपार्ह नव्हतं असंही यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.
आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांच्यात कट रचला गेला होता हे सिद्ध करण्यासाठी NCB सकारात्मक पुरावे गोळा करण्यात आणि परिस्थितीजन्य पुरावे दाखवण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळेच या तिघांना जामीन मंजूर करण्यात आला असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट हे एखाद्या व्यावसायिकाप्रमाणे ड्रग्जच्या गुन्हा सामील आहेत हे या टप्प्यावर सांगणं कठीण आहे. त्यांनी गुन्हेगारी कट रचला असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही असंही कोर्टाने त्यांच्या आदेशात म्हटलं आहे.
नवाब मलिक यांनी साधला निशाणा:
आर्यन खानचा ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही. म्हणजे हा फर्जीवाडा होता, हे आता हायकोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे, असं सांगतानाच हा फर्जीवाडा करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना निलंबित करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
आज हायकोर्टाने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या निकालानंतर नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे याच्या फर्जीवाडयावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी सुरुवातीपासूनच आर्यन खानचे अपहरण खंडणीसाठी करण्यात आले होते हे सांगत होतो. आता हे या आदेशावरून स्पष्ट झाले आहे, असे मलिक यांनी सांगितलं.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Mumbai Cruise Party Aryan Khan case Mumbai high court comment on reasons behind bail.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tips Films Share Price | मनी मेकर स्टॉक! झटपट पैसा वाढवणाऱ्या शेअरची कामगिरी पाहा, शेअरमध्ये रोज अप्पर सर्किट लागतोय
-
Fusion Micro Finance Share Price | कमाईची संधी! हा शेअर 50 टक्के परतावा देईल, दिग्गज ब्रोकरेजने दिली टार्गेट प्राईस, डिटेल्स पहा
-
Emami Share Price | सौंदर्य प्रसाधन ब्रँड कंपनीच्या शेअरने लोकांना करोडपती बनवले, 1 लाखावर 4.69 कोटी परतावा, डिटेल्स पाहा
-
K&R Rail Engineering Share Price | गुंतवणुकदारांना अल्पावधीत श्रीमंत करणाऱ्या शेअरची माहिती पाहा, हा शेअर तेजीत वाढतोय
-
Maiden Forgings IPO | या आठवड्यात हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, मजबूत फायदा होईल
-
IndiaFirst Life Insurance IPO | सरकारी बँक! बँक ऑफ बडोदाची मालकी असलेल्या विमा कंपनी IPO लाँच करणार, डिटेल्स वाचून गुंतवणूक करा
-
Udayshivakumar Infra Share Price | हा IPO शेअर ग्रे मार्केटमध्ये मजबूत वाढतोय, लिस्टिंगच्या दिवशीच गुंतवणुकदार होणार मालामाल
-
Apar Industries Share Price | चमत्कारी शेअर! 10000 रुपयांवर 20 लाख रुपये परतावा, गुंतवणूकदार कशी कमाई करत आहेत पहा
-
Venus Pipes and Tubes Share Price | गुंतवणुकीवर 40% परतावा हवा आहे का? 1 वर्षात 125% परतावा देणारा शेअर मालामाल करेल
-
VST Tillers Tractors Share Price | शेअर बाजार कमजोर असताना हा स्टॉक तेजीत धावतोय, नेमकं कारण काय?