12 May 2025 5:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

मुंबईच्या प्रथम नागरिकाचेच महिलांशी थर्ड-क्लास वर्तन चिंताजनक

Mumbai Mayor, vishwanath mhadheshwar, BMC, Shivsena

मुंबई: मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांताक्रूझ येथे जाब विचारणा-या महिलेचा हात पिरगळून तिला अपशब्द वापरल्याबद्दल तत्काळ त्यांच्याविरोधात ३५४ अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. मंगळवारी विश्वनाथ महाडेश्वर यांचा उद्दामपणा एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला.

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे सोमवारी त्यांच्याच मतदारसंघातील महिलेशी असभ्य वागले. त्यांच्या पदाला हे शोभण्यासारखं नसून ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. यापूर्वी देखील त्यांनी मुंबईतील अनेक गंभीर घटनांवर अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक प्रतिक्रिया दिल्याचा इतिहास आहे. डोळ्यासमोर दिसणाऱ्या गोष्टींवर देखील ते धादांतपणे खोटं बोलताना मुंबईकरांनी अनुभवलं आहे. काही दिवसांपूर्वी अनेक भागात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबलेले असताना देखील त्यांनी ऑन कॅमेरा ते अमान्य करत प्रसार माध्यमांनाच चुकीचं म्हटलं होतं. मुंबईतील शहरामध्ये घडलेल्या अशा अनेक घटनांवेळी त्यांनी संतापजनक वक्तव्य केली आहेत. त्यात शिवसेनेकडून देखील त्यांच्या गैरवर्तनावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आणि त्यांना कोणतीही समज देखील देण्यात आलेली नाही.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर टीका केली. महापौरांच्या सांताक्रुझ मतदारसंघात लेप्टो आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याची पाहणी करण्यासाठी ते मतदारसंघात गेले होते. त्यावेळी महिलांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रश्न केला असता महापौरांनी त्यांच्याशी गुंडगिरीची भाषा केली. तसेच एका महिलेसोबत असभ्यपणे वागण्याचा प्रयत्न केला. त्यांचं हे वागणं योग्य नाही. ते मुंबईचे प्रथम नागरिक आहेत की पहिल्या श्रेणीचे गुंड? महाडेश्वर हे महापौर आहेत. त्यामुळे असं वागणं त्यांच्या पदाला शोभत नाही. त्यांनी तात्काळ महिलांची माफी मागायला हवी, अशी मागणीही मलिक यांनी केली. दरम्यान, सांताक्रुझ येथे महिलांशी चर्चा करताना महाडेश्वर हे एका महिलेशी हुज्जत घालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मलिक यांनी ही टीका केली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या