महत्वाच्या बातम्या
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वाढदिवशी मनसेकडून विनामूल्य कोविशिल्डचे डोस
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस सोमवार १४ जून २०२१ रोजी आहे. या निमित्ताने मनसेच्यावतीने परळच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये मोफत कोविशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस दिली जाईल. यासाठी होणारा सर्व खर्च मनसे करत आहे. मोफत लसीकरण कार्यक्रमासाठी उद्योजक नितीन नायक, निलेशकुमार प्रजापती, उजाला यादव, विजय जैन यांनी मोलाची मदत दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | रहिवासी सोसायटीकडून विहिरीच्या अर्ध्या भागावर RCC | त्यावरच कार पार्क | कार पाण्यात बुडाली
मागील ४ दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईत दादर, सायन, माटुंगा, लोअर परेल, मरिन ड्राईव्ह यासारख्या भागात पावसाची रिपरिप सुरु आहे. या पावसामुळे येथील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी आतापर्यंत झालेल्या पावसामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रस्ते, नाले तुंबल्याचे समोर आले. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकल सेवासुद्धा विस्कळीत झाली होती. मात्र ३-४ दिवसात महिन्याभराचा पाऊस पडल्याने मुंबई शहरात धक्कादायक प्रकार घडताना दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पोलिसाशी हुज्जत आणि पोलीस कॉन्स्टेबलला धक्का | भाई जगताप यांची व्हिडीओ व्हायरल
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. काँग्रेसचं शनिवारी (12 जून) पेट्रोल दरवाढीविरोधात गोरेगावमध्ये आंदोलन सुरु होतं. यावेळी कार्यकर्त्यांना सूचान देण्यासाठी आलेल्या पोलिसांसोबत भाई जगताप यांची बाचाबाची झाली. यावेळी भाई जगताप यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलला जोराचा धक्का देखील दिला. हा संबंध प्रकार कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | शिवसेना आ. दिलीप लांडेंनी कंत्राटदाराला रस्त्यात बसवून डोक्यावर कचरा टाकला
मुंबईतील शिवसेना आमदाराच्या दादागिरीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या महामारीच्या परिस्थितीत चांदीवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडेंनी केलेले कृत्य अतिशय धक्कादायक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीव लांडेंनी एक कंत्राटदाराला पाण्याने भरलेल्या रस्त्यावर बसवले आणि डोक्यावर कचरा टाकला. इतकच नाही, तर या घटनेचा व्हिडिओ काढून व्हायरल केला.
4 वर्षांपूर्वी -
राजकीय पोळी भाजण्यासाठी मेटेंच संतापजनक वक्तव्य | म्हणाले, नक्षलवाद्यांना कळालं ते सरकारला का कळत नाही?
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आता गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून पुन्हा एक पत्रक काढण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी मराठा समाजाने दलाल नेत्यांपासून सावध राहावे, असा इशारा दिला आहे. भाकपा माओवादी कमिटी सचिव सह्याद्रीने हे पत्रक काढले आहे. नक्षलवाद्यांच्या या पत्रकाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक | भाजप कार्यकर्त्याने मुंबई भाजप अध्यक्षांची लायकीच काढली
भारतीय जनता पक्षात एकाबाजूला सत्ता गेल्यापासून आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यात दुसऱ्या बाजूला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांना मुंबई भाजपचे वरिष्ठ नेते अपमानास्पद वागणूक देत असल्याचं देखील समोर आलं आहे. त्यामुळे भाजपला याचा भविष्यात फटका देखील बसू शकतो.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पावसाने घरा घरात पाणी असं म्हणत त्यांनी व्हिडिओ शेअर केला | BMC'ने धन्यवाद म्हणत स्थान विचारलं पण...
मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राकडून आगामी ४८ तासांमध्ये मुंबई व उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची तसेच, काही ठिकाणी अतिमुसळधार पावासाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच, येत्या पाच दिवसात मुंबईसह कोंकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.
4 वर्षांपूर्वी -
संभाजीराजे म्हणतात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार, पण ऑन पेपर ते भाजपचे खासदार - भाजपने डिवचलं
ठाकरे सरकारने जेवढी ताकद आम्ही अजित पवारांसोबत सरकार स्थापन केल्यानंतर कोर्टात लावली, तेव्हढी ताकद मराठा आरक्षणासाठी लावली नाही, असा हल्लाबोल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. ते सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथे बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आल्यास शिवशाहीला नाही तर पेशवाईला फटका
राज्यात सध्या अनेक घान सुरु आहेत. अशात प्रत्येक राजकीय पक्षाचा महत्वाचा नेता आपला पक्ष वाढवण्यासाठी दौरे करत आहे. एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत उत्तर महाराष्ट्राचा दौरा करत आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही विदर्भ दौऱ्यावर आहे. आज (१२ जून) नाना पटोले अमरावतीत असताना त्यांनी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांबद्दल वक्तव्य केले आहे.येत्या निवडणुकीत वंचित आघाडी आणि संभाजीराजे छत्रपती एकत्र आल्यास त्याचा फटका पेशवाईला बसेल, शिवशाहीला नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. ते अमरावतीत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
भाजपविरोधी आघाडी निर्माण करणार | पण प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या कॅम्पेनची जबाबदारी नाही - राष्ट्रवादी
राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीबाबत दिली आहे. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांना दिली.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत पुढील ४८ तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता | मागील ११ दिवसांतच पडला महिन्याभराचा पाऊस
मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राकडून आगामी ४८ तासांमध्ये मुंबई व उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची तसेच, काही ठिकाणी अतिमुसळधार पावासाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच, येत्या पाच दिवसात मुंबईसह कोंकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | यावर्षी बारावीचे सगळेच विद्यार्थी होणार पास | अंतर्गत मूल्यमापनाविषयी लवकरच होणार निर्णय
काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने दहावीच्या परीक्षांप्रमाणेच बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. काल (११ जून) संध्याकाळी राज्य सरकारकडून बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतल्याचा जीआर काढण्यात आला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात शाळांची उन्हाळी सुट्टी संपणार | आता विद्यार्थ्यांना ब्रीज कोर्स अनिवार्य | ब्रीज कोर्स म्हणजे काय?
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते दुसऱ्या लाटेपर्यंत महाराष्ट्रात शाळा बंद आहेत. मार्च 2020 पासून महाराष्ट्रातील शाळा बंद आहेत. सलग दोन वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत. तर, 15 महिन्यांपासून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील प्रगती आणि उजळणीसाठी ब्रीज कोर्स घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद ब्रीज कोर्स म्हणजेच उजळणी अभ्यासक्रम घेणार आहे. हा ब्रीज कोर्स इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल.
4 वर्षांपूर्वी -
सध्या कोणतीही चर्चा नाही, पण भविष्यात आघाडीसंदर्भात प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करू – नाना पटोले
महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आघाडीसंदर्भात महत्वाचं वक्तव्य केलं आहे. निवडणूक आली की, काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय आघाडीची मोठी चर्चा सुरू होते. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चर्चेनंतरही ही आघाडी होऊ शकली नाही. प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेत 42 लाख आणि विधानसभेत 27 लाखांवर मतं घेत काँग्रेस आघाडीचे मोठं नुकसान केलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर आज काँग्रेसनं आंबेडकरांशी भविष्यात जुळवून घेण्याची संकेत दिलेत.
4 वर्षांपूर्वी -
प्रशांत किशोर आणि पवारांच्या भेटीत जयंत पाटलांची सुद्धा उपस्थिती | लोकसभेत महाविकास आघाडी फॉर्म्युला?
पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर आणि उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्ष आणि मोदी विरोधी वातावरण झाल्याचे संकेत मिळताच मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आज शरद पवारांच्या भेटीसाठी मुंबईत आले आहेत. त्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
वाढदिवसाला त्यांनी केक जास्त खाल्ला असेल | पिंजऱ्याचं दार उघडं ठेवतो आतमध्ये येऊनच दाखवा - संजय राऊत
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आपल्या वाढदिवशी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी वाकयुद्ध रंगले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांनी पाटील यांची पुन्हा फिरकी घेतली. काल त्यांचा वाढदिवस होता, त्यांनी जास्त केक खाल्ला असेल. त्यांना फारसे गांभीर्याने घेऊ नका असे राऊत म्हणाले. ते नंदुरबारमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
सर्वोच्य धक्का | सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंग यांची महाराष्ट्राबाहेर चौकशी करण्याची याचिका फेटाळली
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्य न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. सुप्रीम कोर्टानं परमबीर सिंह यांची महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र यंत्रणानी त्यांच्या विरोधीत प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. सर्वोच्य न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे. महाराष्ट्र सरकारला हा मोठा दिलासा मानला जात आहे.सर्वोच्य न्यायालयानं तुम्ही 30 वर्षे पोलीस दलात वर्ष काम करत आहेत. तुम्ही आता महाराष्ट्राबाहेर चौकशी करण्याची मागणी करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ATM सेवाकर अजून वाढला | तो काळ दूर नाही जेव्हा मोदी सरकार पैशांना स्पर्श अन बघण्यासाठी सुद्धा कर आकारेल - सचिन सावंत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशाला संबोधित करताना त्यावेळी चलनात असणाऱ्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. मोदी सरकारद्वारे त्यावेळी देशातील भ्रष्टाचार, दहशतवाद, काळा पैसा जमा करणाऱ्यांच्या विरोधात हे पाऊल उचलण्यात आलं होतं. नोटा रद्द केल्यानंतर विहित मुदतीत त्या बँकांकडे जमा करण्यास सांगण्यात आलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणूक २०२४ | मोठी रणनीती आखली जातेय | आज प्रशांत किशोर पवारांची भेट घेणार
प्रत्यक्ष मोदींना सत्तेत आणण्यासाठी महत्वाची रणनीती आखणारे प्रशांत किशोर सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहेत. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल ते दिल्लीमध्ये भाजपच्या रणनीतीला धोबीपछाड देणारे प्रशांत किशोर सध्या २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्यासोबत दीर्घकाळ चर्चा केली होती. त्यानंतर आता दुसरं आणि अत्यंत महत्वाचं वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
हमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी
केंद्र सरकारने बुधवारी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. यानुसार, धानाच्या हमीभावात क्विंटलमागे ७२ रुपयांची किरकोळ वाढ करण्यात आली असून डाळी, तेलबिया व तृणधान्ये यांच्या हमीभावात देखील भरीव वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हमीभाव वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, या टार्गेट प्राईसवर एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA