मुंबई : महाराष्ट्रात टप्या टप्याने प्लास्टिकवर संपूर्ण बंदी येणार असून त्याला राज्यसरकारची मंजुरी मिळाली असून त्याचा शुभारंभ येत्या गुढीपाडव्यापासून होणार आहे.
प्लास्टिकवर टप्या टप्याने संपूर्ण बंदी आणण्याची सरकारची योजना असून त्याला महाराष्ट्र सरकारची अधिकृत मंजुरी मिळाली आहे. तसेच महत्वाचं म्हणजे ६ महिन्यानंतर पाण्याच्या बाटल्याही संपूर्ण बंद होणार आहे.
महाराष्ट्र सरकार ६ महिन्यानंतर पाण्याच्या बाटल्याही संपूर्ण बंद होणार आहे आणि नाशवंत तसेच पुनरवापर करण्यास उपयुक्त अशा पाण्याच्या बाटल्यांवर भर दिला जाणार आहे.
प्लास्टिक हे निसर्गाला हानिकारक असते त्यामुळे सरकारने घेतलेला हा निर्णय पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे.
 
						 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		