1 May 2025 4:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

वरळी विधानसभा लढाई; रस्त्यावरील खड्डयांनी त्रस्त जनता विरुद्ध नाईट लाईफ अशी असेल

Aditya Thackeray, Shivsena, MNS, Sandeep Deshpande, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई : शिवसेना नेते आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता शिवसेनेतच जोर धरू लागली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील नेमके कोणत्या मतदारसंघातून लढावे याची पूर्ण चाचपणी एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिवसेनेने केल्याची खात्रीलायक माहिती प्रसार माध्यमांकडे आहे. युवा सेनेचे सरचिटणीस व आदित्य यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांनी सोमवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून या विषयाची माहिती सार्वजनिक केली. संबंधित पोस्टमध्ये लिहिले की, ‘हीच वेळ आहे हीच संधी. लक्ष्य विधानसभा २०१९. महाराष्ट्र वाट पाहतोय!’ त्यामुळे ठाकरे कुटुंबात आदित्य यांनी निवडणूक लढण्यासंदर्भात गांभीर्याने विचार सुरू असल्याचे म्हटले जाते.

सूत्रांनी सांगितले की, शिवसेनेच्या एका अंतर्गत सर्व्हेमध्ये आदित्य ठाकरे यांनी कुठून लढावे यासंदर्भात एक सर्वेक्षण करून घेतले आहे. त्यात ४ मतदारसंघांचा पर्याय समोर आला. त्यानुसार वांद्रे पूर्व, माहिम, शिवडी आणि वरळी हे ते ४ मतदारसंघ आहेत. चारही मतदारसंघांमध्ये अनुक्रमे तृप्ती सावंत, सदा सरवणकर, अजय चौधरी आणि सुनील शिंदे हे शिवसेनेचे आमदार आहेत. त्यात शिवडी येथून मनसेचे बाळा नांदगावकर विधानसभा लढवत असल्याने शिवसेना कोणताही धोका पत्करणार नाही, तसेच माहीम विधानसभेची जागा आज जरी शिवसेनेकडे असली तरी त्याचं मूळ कारण २०१४ मधील मोदी लाट हेच होतं ज्याचा थेट फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला झालं होता. तसेच येथून मनसेचे नितीन सरदेसाई विधानसभा लढवत असल्याने शिवसेना येथून देखील धोका पत्करणार नाही.

त्यात वांद्रे पूर्व येथून अल्पसंख्यांकाची मतं मोठ्या प्रमाणावर असल्याने काय होईल सांगता येणार नसल्याने शिवसेना येथून देखील धोका पत्करणार नाही. त्यामुळे पहिली पसंती ही वरळीला असेल. वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. कारण विधानसभेचे माजी अध्यक्ष दत्ताजी नलावडे यांनी १९९० ते २००४ पर्यंत चार वेळा या ठिकाणी विजय मिळविला होता. २००९ मध्ये राष्ट्रवादीचे सचिन अहिर यांनी विजय मिळवून शिवसेनेला धक्का दिला होता; पण २०१४ मध्ये मोदी लाटेत शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी या ठिकाणी मोठा विजय मिळवून बालेकिल्ला पुन्हा मिळवला. दरम्यान, शिवडी आणि माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेची मोठी ताकद असल्याने या मतदासंघात शिवसेना कमीत कमी आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत कोणताही धोका पत्करेल असं वाटत नाही.

दरम्यान मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करून मुंबई महापालिकेत सत्तेत आलेल्या शिवसेना पक्ष आणि त्यांचे नेते आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा निवडणुकीतील बातम्यांना अनुसरून एक खोचक ट्विट केले आहे आणि आदित्य ठाकरे समर्थन करत असलेल्या मुंबई नाईट लाईफची देखील खिल्ली उडवली आहे. काय ट्विट केलं आहे संदीप देशपांडे यांनी;

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या