14 December 2024 4:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार | पालिका आयुक्तांचे आदेश

School in Mumbai, Remain close, Till 31st December, BMC Commissioner Iqbal Chahal

मुंबई, २० नोव्हेंबर: मुंबईतील कोरोनाबाधितांचा पुन्हा वाढणारा आकडा लक्षात घेता मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील वाढत संसर्ग लक्षात घेता मुंबईत शाळा सुरु होणार नाहीत, असे आदेश मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशांप्रमाणे, येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईतील शाळा बंदच ठेवण्यात येतील. खरंतर,राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने येत्या सोमवारपासून राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, आयुक्तांच्या आदेशांनुसार मुंबईत या वर्षाअखेरपर्यंत शाळा बंदच राहतील.

महाराष्ट्रात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. तर दुसरीकडे मुंबईसह राज्यातील करोनाचं सावट अजूनही कमी झालेलं नाही. जनजीवन पूर्वपदावर येत असून, रस्त्यांवर गर्दीही वाढताना दिसत आहे. त्यामुळे करोना प्रसाराचा धोका वाढला असून, दिवसागणिक रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. मुंबईतही करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बृह्नमुंबई महापालिकेनं आपल्या हद्दीतील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील शाळा पुढच्या वर्षीच सुरू होणार आहे.

 

News English Summary: Corona infestation in the state, including Mumbai, has not abated. Public life is returning to normal, and the crowds on the streets are growing. As a result, the risk of coronary heart disease is increasing and the number of patients is increasing day by day. Due to the increasing prevalence of corona in Mumbai too, BMC has decided to keep schools within its limits closed. Municipal Commissioner Iqbal Chahal has issued an order in this regard.

News English Title: School in Mumbai city area will remain close till 31st December said Municipal Commissioner Iqbal Chahal News updates.

हॅशटॅग्स

#BMC(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x