13 August 2022 9:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ratna Jyotish | आर्थिक तंगीत अडकलेल्यांना अर्थसंपन्न करेल हे शुभं रत्न, आर्थिक भरभराटीसाठी फायदेशीर अजब! स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या यामिनी जाधव, यशवंत जाधवांना सोबत घेऊन मुंबईतील भ्रष्‍टाचारी व्यवस्थेला तडीपार करणार? भाजपने जो घाबरेल त्याला घाबरवलं आणि जो विकला जाईल त्याला खरेदी केलं, तेजस्वी यादवांनी अनेकांची लायकीच काढली Mutual Fund Top Up | म्युच्युअल फंड टॉप-अपचा दुहेरी फायदा कसा घ्यावा, मजबूत नफ्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घ्या Viral Video | ती चालत्या गाडीच्या खिडकीबाहेर बॅलेन्स टाकून नाचत होती, पण तिच्यासोबत असं काही धक्कादायक घडलं Horoscope Today | 13 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Small Saving Schemes | गुंतवणूकदारांना दुहेरी लाभ, या लहान बचत योजनांमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा आणि टॅक्स सूट मिळवा
x

अर्णब गोस्वामीवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी

Shiv Sena MP Arvind Sawant, Home Minister Anil Deshmukh, Arnab Goswami

मुंबई, १८ ऑगस्ट : पालघर येथील साधुंचा झुंडबळी तसेच वांद्रे स्थानकाबाहेरील स्थलांतरितांची गर्दी याबाबत चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गोस्वामी यांच्याविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते रद्द करण्याच्या मागणीसाठी गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गोस्वामी यांच्याविरोधात कुठलाही गुन्हा सिद्ध होत नसल्याचे सकृतदर्शनी दिसून येते, असे नमूद करत न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने कारवाईस स्थगिती दिली होती.

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध अपमानजनक भाषेचा वापर करून सरकार पाडण्याची धमकी दिल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंच्या फॅन्स क्लबतर्फे निषेध नोंदविण्यात आला होता. त्यानंतर अर्णब गोस्वामी यांना अटक करून त्यांच्या चॅनलविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी तक्रारही नागपूरमधील कळमना पोलिसांकडे करण्यात आली होती. उद्धव ठाकरे फॅन्स क्लबचे रवनीश पांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रिपब्लिकन भारत या चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपमानजनक भाषेचा वापर केला होता.

दरम्यान आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अर्णब गोस्वामीवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणी त्यांनी गृहमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे की, पत्रकार अर्णब गोस्वामी हे सतत बेजबाबदार बातम्या प्रसारित करत आहेत. कुठल्याही पुराव्याशिवाय राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांवर बेछूट आरोप लावण्यापर्यंत त्यांच्या चॅनेलची मजल गेली आहे. बातम्या प्रसारित करताना यापूर्वीही त्यांनी राजकीय नेत्यांवर खास करुन विरोधी पक्षांच्या नेत्यांवर अश्लाध्य शब्दात आरोप करुन चारित्र्यहनन केले होते. त्यामुळे यापूर्वीही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.

तसेच एका मृत महिलेबाबत आरोप करताना पत्रकारितेतील सर्व नीतीमत्ता त्यांनी ओलांडली आहे. त्या मृत महिलेची विटंबना आणि चारित्र्यहननाचे पातक त्यांच्याकडून घडले आहे. सदर महिलेच्या पालकांनी अशा अशोभनीय बातम्यांबद्दल आक्षेप घेतला आहे. अर्णब गोस्वामी अत्यंत वाईट पद्धतीने प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. काही लोकांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी गुन्ह्यासंदर्भात विभाजक आणि बेजबाबदार बातम्या खळबळजनक प्रसारित करुन अर्णब गोस्वामी समाजात तेढ निर्माण करुन लोकांना चिथावणी देण्याचे काम करत आहेत त्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल अशी भीती खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केली आहे.

 

News English Summary: Shiv Sena MP Arvind Sawant has called on Home Minister Anil Deshmukh and demanded immediate legal action against Arnab Goswami. He has given a statement to the Home Minister Anil Deshmukh in this regard.

News English Title: Shiv Sena MP Arvind Sawant demand to Home Minister Anil Deshmukh over take action against Arnab Goswami News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1154)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x