15 December 2024 1:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

नवा वचननामा प्रसिद्ध; १२ मंत्री व ६३ आमदारांनी ५ वर्षात काय दिवे लावले त्यावर तोंड बंद

Shivsena Vachannama, Maharashtra Vidhansabha Election 2019

मुंबई: “वचननाम्यात वचनं विचार करून देण्यात आली आहे. शिवसेना जे बोलते ते करते. राज्याच्या तिजोरीवर किती भार पडेल याचा विचार करूनच हा वचननामा तयार करण्यात आला आहे. १० रूपयांमध्ये अन्न देण्याचा घेतलेल्या निर्णयात आम्ही बचतगटांची मदत घेणार आहोत. तिजोरीवर कितीवर भार पडेल हा विचार करून आम्ही जेवण १० रूपयांनी देण्याचा निर्णय घेतला आहे. समतोल ढळणार नाही याचा विचार करून वचननामा तयार केला आहे. यातलं एकही मत खोटं ठरणारं नाही,” असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं. आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल देसाई यांच्या उपस्थिती आज हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेच्या या वचननाम्यात आश्वासनांची खैरात वाटण्यात आली आहे.

१० रुपयांत चांगलं सकस जेवण. तेही स्वच्छ आणि व्यवस्थित असेल. विशेषत: एका किचनमधून त्याचं वितरण केलं जाईल. महिला बचत गटांतील महिलांना यामध्ये सामावून घेतलं जाईल, असं शिवसेने वचननाम्यात म्हटलंय. या शिवाय घरगुती वापरातील वीजेसाठी ३०० युनिटपर्यंत ३० टक्क्यांनी दर कमी करण्याचं आश्वासन शिवसेनेनं दिलंय. २०० प्राथमिक आरोग्य चाचण्या ज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्या आरोग्यचाचण्या एका रुपयात देण्याची ग्वाही वचननाम्यातून देण्यात आली आहे. तसंच अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक वर्षाला १०००० रुपये जमा करण्याचं वचन शिवसेनेनं दिलं आहे.

दरम्यान, मागील ५ वर्षात सत्तेला लाथ मारण्याच्या धमक्या देणारे मंत्री आणि आमदार यांनी राजीनामे खिशातच ठेवले. त्यात सेनेच्या १२ मंत्र्यांनी आणि ६३ मदारांनी मागील ५ वर्षात कोणती विकासाची कामं केली याचा कोणताही हिशेब उद्धव ठाकरे मतदाराला सभांमधून देताना दिसत नाहीत आणि केवळ भावनिक मुद्दे पुढे करून तीच तीच पोकळ आश्वासनं देताना दिसत आहेत. चंद्रपूरचे सेनेचे आमदार बाळू धानोरकर यांनी तर भर सभेत शिवसेनेच्या मंत्र्यांना बिनकामाचे असा शिक्का मारला होता आणि आता तेच बाळू धानोरकर काँग्रेसमध्ये राज्यातील एकमेव खासदार आहेत.

वचननाम्यातील मुद्दे;

  1. फक्तं 10 रुपयांमध्ये जेवणाची सकस थाळी. त्याच कँटीनमध्ये 100 रुपयांपर्यंत जेवण मिळणार.
  2. गावातील विद्यार्थ्यांसाठी विशेष बससेवा
  3. वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना.
  4. महिला सक्षमीकरणावर भर.
  5. महिला बच गटासाठी जिल्हास्तरावर कँटीन
  6. तिर्थक्षेत्र प्रवासासाठी समन्वयक केंद्रांची स्थापना
  7. खतांचे दर 5 वर्ष स्थीर राहतील, याची योजना
  8. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पीकविमा मिळणार
  9. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार
  10. गरजू शेतकऱ्यांना दरवर्षी 10 हजार
  11. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी विशेष तरतूद
  12. घरगुती वापरातील विजेचे दर 30 टक्क्यांनी कमी करणार
  13. मुंबईच्या वचननाम्यात आरेचा उल्लेख जंगल असा करणार

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x