14 July 2020 6:16 PM
अँप डाउनलोड

कट्टर शिवसैनिक दिवंगत बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांची हकालपट्टी

MLA Trupti Sawant, MLA Bala Sawant, Mayor Vishwanath Mahadeshwar, Uddhav Thackeray, Bandra East, Shivsena, Maharashtra Vidhansabha Election 2019

मुंबई: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ हे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातच शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारून निवडणूक लढणाऱ्या आमदार तृप्ती सावंत यांची अखेर शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून सावंत यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भाजपाने बंडखोरांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतही कारवाईची सूत्रं हलली आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर शिवसेनेमध्ये तिकिट न मिळालेल्या पदाधिकाऱ्यांनी काही ठिकाणी पक्षाच्याच अधिकृत उमेदवाराविरोधात तर काही ठिकाणी युतीमधील मित्रपक्षाच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केली आहे. शिवसेनेने मंगळवारी नांदेड, हदगाव, चंदगड, बुलडाणा आदी १४ विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्या १९ शिवसेना पदाधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला होता.

वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेने बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांच्याविरोधात तत्कालीन काँग्रेसचे नेते नारायण राणे निवडणूक लढवित होते. मात्र सहानभुतीच्या जोरावर तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा पराभव केला. मात्र आता तृप्ती सावंत यांना निवडणुकीत तिकीट देण्याबाबत शिवसेनेने अनुकुलता दाखविली नाही. त्यांच्या जागेवर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना तिकीट देऊन तृप्ती सावंत यांनी उमेदवारी नाकारण्यात आली.

२०१५ च्या पोटनिवडणुकीमध्ये तृप्ती सावंत यांना ५२ हजार ७११ मते मिळाली आणि १९ हजार ८ मताधिक्याने त्यांना विजय मिळाला. काँग्रेसच्या नारायण राणे यांना ३३ हजार ७०३ मते मिळाली होती; तर एमआयएमच्या राजा रहबर खान यांना १५ हजार ५० मते मिळाली होती. या निवडणुकीत भाजपाचा उमेदवार रिंगणात नव्हता.

दिवंगत आमदार बाळा सावंत यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात असून, शिवसेनेने विधानसभेतील एकमेव महिला आमदाराला तिकीट नाकारून सावंत यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप त्यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा सावंत यांनी २०१५ च्या पोटनिवडणुकीत पराभव केला होता, याकडे पक्षाने दुर्लक्ष केल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Shivsena(892)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x