26 May 2022 6:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

आमदार सरनाईक मुंबईत दाखल | ईडीच्या कारवाईवर दिली पहिली प्रतिक्रिया

Shivsena MLA Pratap Sarnaik, ED raids

मुंबई, २४ नोव्हेंबर: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ईडीने कारवाई नेमकी का केली? याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आज ईडीने छापे मारले. प्रताप सरनाईक यांच्या मुलालाही ईडीने ताब्यात घेतलं. या कारवाईच्या वेळी प्रताप सरनाईक हे घरी नव्हते. त्यानंतर सुमारे ८ ते ९ तासांनी त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सामनाचं कार्यालय गाठत संजय राऊत यांची भेट घेतली. त्याआधी हे नक्की काय प्रकरण आहे? ईडीने आम्हाला कशाला बोलावलं आहे ? ही सगळी कारवाई नेमकी का केली आहे ते आपल्याला माहित नाही असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

प्रताप सरनाईक मुंबईत येताच त्यांनी संजय राऊत यांची सामना कार्यालयात भेट घेतली, तिथं त्यांच्यात सुमारे १ तास चर्चा झाल्याचं समजतंय. त्यानंतर त्यांनी माध्यमांना दिलेल्या माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रिया देताना त्यांनी ईडीने आम्हाला का बोलावलं आहे? ही सगळी कारवाई नेमकी का केली? तसंच, या विरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचं, त्यांनी सांगितलं आहे.

 

News English Summary: ED raided Shiv Sena MLA Pratap Saranaik’s house today. Pratap Saranaik’s son was also taken into custody by the ED. Pratap Saranaik was not at home at the time of the action. About 8 to 9 hours after that, their reaction has come to the fore. He reached the match office and met Sanjay Raut. Before that, what exactly is this case? Why has the ED called us? Pratap Saranaik has said that he does not know exactly why all this action has been taken.

News English Title: Shivsena MLA Pratap Sarnaik reaction on ED raids News updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1153)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x